Get Rid From Cockroach : घरातील झुरळं होतील पसार ; 1 ॲल्युमिनियम फॉइल आणि ‘हे’ घटक करतील कमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Get Rid From Cockroach : उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये झुरळं, मुंग्या , पाल अशा कीटकांचा वावर प्रामुख्याने जाणवायला लागतो. विशेषतः किचनमध्ये हे कीटक (Get Rid From Cockroach) नुसता उच्छाद मांडतात.या दिवसात अन्न पदार्थांना मुंग्या लागण्याचे प्रमाण देखील अधिक असते. अशावेळी मग साहजिक पेस्ट कंट्रोल करून या कीटकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पेस्ट कंट्रोल करण्यासाठी विविध विषारी रसायनांचा वापर केला जातो. जी आपल्या शरीरासाठी घातक असतात. विशेषतः घरात जर लाहान मुलं असतील तर त्याचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात एक भन्नाट ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून घरातील झुरळं, मुंग्या , पाली अशा कीटकांचा उपद्रव होणार नाही. चला जाणून घेऊया…

अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा ॲल्युमिनियम फॉइल (Get Rid From Cockroach) काम झाल्यावर फेकून देऊ नका. त्याचा चांगला वापर करून तुम्ही घरातल्या कीटकांना तुमच्या घरातून पळवून लावू शकता. हा उपाय करण्यासाठी खाली दिलेल्या ट्रिकचा वापर करा.

आज आम्ही जे तुम्हाला उपाय सांगणार आहोत हा उपाय केवळ झुरळं घालवण्यासाठी नाही तर मुंग्या आणि पाली यांना घावण्यासाठी सुद्धा प्रभावी (Get Rid From Cockroach) ठरेल.

  • हा उपाय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक अल्युमिनियम फॉईल घ्या.
  • त्यानंतर एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून साखर आणि एक टेबलस्पून कोणतीही टूथपेस्ट घ्या.
  • आता त्यामध्ये एक लिंबू त्याच्या साली सकट तुम्हाला (Get Rid From Cockroach) किसून टाकायचा आहे.
  • आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.
  • आता ॲल्युमिनियम फॉईलचे चौकोनी तुकडे तयार करा.
  • त्यामध्ये आपण तयार केलेले मिश्रण बरोबर मधोमध ठेवा आणि एखाद्या बॉल प्रमाणे त्या ॲल्युमिनियम फॉईलची गुंडाळी करा.
  • अल्युमिनियम फॉईलच्या बॉलला आता तुम्हाला पिन किंवा टूथपिकच्या (Get Rid From Cockroach) सहाय्याने वरती 7-8 छिद्र पाडायची आहेत.
  • आता हे ॲल्युमिनियम फॉईलचे बॉल तुमच्या घरामध्ये जिथे पाली, मुंग्या ,झुरळं जास्तीत जास्त दिसतात तिथे ठेवून द्या. बॉल जिथे दिसतील तिथे मुंग्या, पाली फिरणार (Get Rid From Cockroach) नाहीत.