Get Rid Off Earthworms : पावसाळ्याच्या दिवसात घरात गोम, गांडूळ येतात ? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Get Rid Off Earthworms : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की अनेक प्रकारचे कीटक घरामध्ये यायला सुरुवात होते. विशेषतः ओल असणाऱ्या, सिंक असणाऱ्या ठिकाणी तसेच बाथरूम मध्ये गांडूळ, गोम, गोगलगाय तुम्हाला आढळून येईल. हे प्राणी छोटे जरी असले तरी हे अत्यंत किळसवाणे वाटतात. शिवाय गोम कानात जाऊन आपल्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये हे कीटक तुमच्या घरापासून दूर घालवायचे असतील तर काय करावे याच्या ट्रिक्स जाणून (Get Rid Off Earthworms) घेऊयात…

बाथरूम स्वच्छ ठेवा

खरंतर गांडूळ हा बाथरूमच्या सिंक मधून येतो किंवा जर तुमचे बाथरूम काही ठिकाणी फुटले असेल किंवा त्याला चिरा पडल्या असतील, त्यातील फरशांना तडा गेला असेल तर अशा ठिकाणांमधून ते तुमच्या बाथरूम मध्ये प्रवेश करतात. याशिवाय जिथे साफसफाई नीट केली जात नाही बाथरूम चा उपयोग केल्यानंतर ते स्वच्छ केले जात नाही किंवा तिथे व्हॅक्यूम क्लिन ती जागा केली जात नाही (Get Rid Off Earthworms) तिथे हे कीटक येत असतात त्यामुळे तुमचा बाथरूम आधी स्वच्छ ठेवा.

रिफाइंड तेल

जर बाथरूमच्या किंवा सिंगच्या नळीतून सतत कीटक बाहेर येत असतील तर एक जाळी फिट करून घ्या. त्यानंतर काही दिवस बाजारात मिळणाऱ्या स्प्रेचा तुम्ही वापर करू शकता. शिवाय एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरा आणि त्यात रिफाईंड तेल (Get Rid Off Earthworms) मिसळा त्यानंतर बाथरूमच्या कानाकोपऱ्यात जिथे कीटक येतात तिथे हा नियमित स्प्रे करा.

पेपर मेंट ऑइल स्प्रे (Get Rid Off Earthworms)

हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पेपर मेंट ऑइल घ्या. आता त्यामध्ये पाणी घाला आणि व्यवस्थित शेक करा. रात्री झोपण्याच्या आधी हे मिश्रण बाथरूमची पाईप, बेसिन सिंक आणि ज्या ठिकाणी हे कीटक येतात तिथे स्प्रे करा. हा उपाय नियमित केला तर घरात गांडूळ शिरणार नाही. शिवाय जर तुमच्याकडे पेपर मेंट ऑइल नसेल तर पुदिनाच्या सुकलेला पानांचाही तुम्ही वापर (Get Rid Off Earthworms) करू शकता.