हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आवडीच्या गाडीसोबत आपल्या पसंतीची नंबर प्लेट भेटणे कठीण असते. अनेकदा नंबर प्लेटमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते, त्यामुळे बरेचजण लकी नंबर भेटावा यासाठी धडपड करत असतात. अशा वाहन खरेदीदारांसाठी राज्य परिवहन विभागाने नंबर प्लेटबाबत दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता वाहनासाठी आवडीचा क्रमांक (चॉइस नंबर) निवडण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चॉइस नंबरसाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज भासणार नाही . या निर्णयामुळे बरेच फायदे होणार आहेत.
फॅन्सी परिवहन नावाचे संकेतस्थळ सुरू –
हि सेवा २५ नोव्हेंबरपासून राज्यभर सुरु झाली आहे. नवीन वाहनासाठी चॉइस नंबर रिझर्व करणे तसेच त्यासाठी भरावे लागणारे पैशाची प्रक्रिया हि पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही . यासाठी तुम्हाला आरटीओने फॅन्सी परिवहन नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. ज्यामुळे तुमची प्रोसिजर सहज आणि सुलभ होईल.
रजिस्ट्रेशन कसे करावे –
फॅन्सी परिवहन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही प्रथम संकेतस्थळावर जावा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणीसाठी आपला मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी वापरून OTP द्वारे खाते तयार करा. त्यानंतर उपलब्ध चॉइस नंबरमधून आपल्या पसंतीचा क्रमांक निवडा. तसेच रक्कम ऑनलाइन भरून ई पावती मिळवा आणि त्याची प्रिंटआउट काढा. हि प्रिंट घेतलेली ई पावती वाहन विक्रेत्याला द्या . जर एकाच नंबरसाठी खूप अर्ज आल्यास , त्याचा लिलाव केला जाईल . या लिलावाची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. लिलावात सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला तो क्रमांक दिला जाईल.
6000 हून अधिक चॉइस नंबर विक्री –
आरटीओने चॉइस नंबरची रक्कम दुपटीने वाढवले आहे. विशेषतः 0001 या क्रमांकासाठी प्रमुख शहरांमध्ये तब्बल 6 लाख रुपये मोजावे लागत आहेत. या बदलांमुळे गेल्या दोन महिन्यांत केवळ मुंबईतील आरटीओ कार्यालयांमधून 6000 हून अधिक चॉइस नंबर विक्री झाली आहे, ज्यातून १२ कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा झाला आहे. ही सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांचा वेळ वाचणार असून, संपूर्ण प्रक्रिया सोपी व पारदर्शक होणार आहे.