Gilt Funds म्हणजे काय? यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणते लाभ मिळतात ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gilt Funds) आजकाल प्रत्येक व्यक्ती भविष्याच्या सुरक्षिततेचा विचार करते. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षित भविष्य, आर्थिक संरसक्षण आणि संपत्तीमध्ये वाढ करता येते. त्यामुळे आजच्या गतिमान जगात गुंतवणूक अत्यंत महत्वाची आहे. पण गुंतवणूक करताना ती जोखीममुक्त असेल तर लाभदायी ठरते. तर अशा गुंतवणुकीसाठी एचडीएफसी लाईफ स्मार्ट प्रोटेक्टची गिल्ट फंड ही एक उत्तम योजना मानली जाते. ही योजना डेट फंडचा एक प्रकार असून तुलनेने जोखीममुक्त गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांकडून गिल्ट फंडला चांगली पसंती मिळते आहे.

त्यामुळे जर तुम्हीही जोखीममुक्त गुंतवणुकीच्या शोधात असाल तर (Gilt Funds) गिल्ट फंडाविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ही गुंतवणूक तुम्हाला आर्थिक संरक्षण देईल. यासोबत तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया गिल्ट फंड नेमका काय प्रकार आहे? आणि यात गुंतवणूक केल्यास कसा फायदा मिळतो?

गिल्ट फंड म्हणजे काय? (Gilt Funds)

आज प्रत्येक गुंतवणूकदार आर्थिक वाढ आणि सुरक्षितता प्रदान करणारे गुंतवणुकीचे पर्याय शोधतो आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी गिल्ट फंड हा डेट फंडाचा एक सर्वोत्तम प्रकार आहे. जो इतर गुंतवणुकींपेक्षा तुलनेने जोखीममुक्त गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला आहे. गिल्ट फंडच्या माध्यमातून प्रामुख्याने सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली जाते. ज्याला G-Secs असे ओळखले जाते.

(Gilt Funds) गिल्ट फंड हे मूलत: सरकारी रोख्यांमध्ये कर्ज निधीच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक असते. हे नाव सरकारी रोख्यांसाठी जारी केलेल्या गिल्ड-एज प्रमाणपत्रांवरून आले आहे. मुळात, सरकारला एक अत्यंत विश्वसनीय कर्जदार मानले जाते. परिणामी, गिल्ट फंडात गुंतवणूक करताना कमीत कमी जोखीम असल्याचे स्पष्ट होते. या स्कीमला डीफॉल्ट धोका म्हणूनदेखील संबोधले जाते.

‘या’ गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर

गिल्ट फंड ही अंतर्निहित सुरक्षितता प्रदान करणारी योजना आहे. जी जास्त जोखीम न घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कमी-जोखमीच्या विविधता असलेल्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी अत्यंत चांगली आणि आकर्षक पर्याय म्हणून ओळखली जाते. मुख्य म्हणजे, गिल्ट फंड सापेक्ष सुरक्षेचा लाभ देतात. (Gilt Funds) त्यामुळे लक्षात घ्या, यात इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत नेहमीच सर्वाधिक परतावा मिळेल असे नाही. मात्र चांगल्या आर्थिक धोरणासाठी, एचडीएफसी लाइफ स्मार्ट प्रोटेक्टसारख्या उत्पादनांचा समावेश करणे नेहमीच फायदेशीर ठरू शकते.

HDFC लाईफ स्मार्ट प्रोटेक्टच्या गिल्ट फंड योजनेचे फायदे

  • गिल्ट फंडमध्ये गुंतवणूक केल्यास एखाद्या अनपेक्षित वा अचानक घडलेल्या घटनेबाबतीत आपल्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षा प्रदान केली जाते.
  • पॉलिसी मॅच्युरिटीनंतर तुम्हाला खात्रीशीर लाभ मिळेल आणि तुमची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होईल. (Gilt Funds)
  • या योजनेतील गुंतवणुकीची लवचिकता तुम्हाला तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये निवड करण्याची संधी देईल. त्यामुळे किती जोखीम घ्यायची हे तुमच्या हातात असेल.
  • गिल्ट फंडच्या सुरक्षिततेमूळे तुम्ही एक मजबूत फायनॅन्शियल प्लॅन करू शकता. जो तुमच्या प्रियजनांना भविष्यात आर्थिक संरक्षण प्रदान करेल.