अमेरिकेतील निवडणुकानंतर , सोन्याचा भाव एका दिवसात 2000 रुपयांनी घसरला, चांदीच्या दरातही घसरण

gold rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. यानंतर लगेचच सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला असून दोन्हीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचा भाव 76,500 पर्यंत खाली उतरला आहे. तर एमसीएक्स वर सोन्याचा वायदा काल 78 हजार 593 रुपयांवर ट्रेंड करत होता. COMEX मध्ये सुद्धा सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. US मध्ये सोन्याचा दर जवळपास 100 डॉलरली घसरला होता. 30 ऑक्टोबरला सोन्याचा दर 2802 डॉलर इतका रेकॉर्ड झाला होता. त्यामध्ये 150 डॉलर ने घसरण झाली आहे.

चांदीचे दर

चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास चांदीचे दर MCX वर 90 हजार पाचशे रुपयांपर्यंत घसरले आहेत. चांदीच्या दरात चार टक्के घसरण झाली आहे. 23 ऑक्टोबरला चांदीचा दर एक लाख 81 रुपये होता. तरCOMEX वर सलग दुसऱ्या आठवड्यात हे घसरण झालेली दिसून येत आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदीचा दर काल 31 डॉलर ने घसरला आहे.

डॉलर इंडेक्स वाढला

तज्ञांच्या म्हणण्यानुसार डॉलर इंडेक्स चार महिन्यात सर्वाधिक उंचीवर गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर इंडेक्स आणि बॉण्ड इल्ड यामध्ये तेजी आली आहे. तर सोन्याच्या दरातील चढ-उतार हे इतरही कारणांमुळे होत असतात. यामध्ये सोन्याची मागणी तसेच अन्य कारणे असतात.

भारतातील आजचे दर

तर भारतात आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर काय आहे? याबाबत माहिती घेतली असता गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरेट 1g सोन्याचा दर 7200 इतका असून आज सोन्याच्या दरात 165 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर 7856 रुपये इतका असून यामध्ये 179 रुपयांची घसरण झाली आहे. तर अठरा कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर पाच हजार 891 रुपये इतका असून यामध्ये 135 रुपयांची घसरण झाली आहे.