हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gold Buying Rules) आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीयेचा शुभ सण आहे. हिंदू मान्यतेनुसार, आजच्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराट होते. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्व आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये आजच्या दिवशी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी दिसते. बरेच लोक सोने खरेदीसाठी या दिवसाची वाट पाहत असतात. भारतात सोने खरेदी करणे याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे देशात सोने खरेदी करण्याकडे लोकांचा विशेष कल दिसतो.
त्यामुळे आज आपण सोने खरेदीच्या एका अत्यंत महत्वाच्या नियमांबाबत जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल सोने खरेदी करताना तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. (Gold Buying Rules) आपल्याकडे एका ठराविक रकमेपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करताना ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. अर्थात आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दिल्याशिवाय एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त सोने खरेदी येत नाही. याबाबत आयकर विभागाचा नेमका काय नियम आहे ते जाणून घेऊया.
सोने खरेदीबाबत आयकर विभागाचा महत्वाचा नियम (Gold Buying Rules)
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 269 ST मध्ये नमूद केल्यानुसार, एका दिवसात २ लाख रुपयांपेक्षा अधिक रोख व्यवहारांवर बंदी आहे. अर्थात, जर तुम्ही एखाद्या दिवशी २ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे दागिने रोखीने खरेदी केलात तर तुम्ही आयकर कायद्याचे उल्लंघन करताय असे गृहीत धरले जाते.
(Gold Buying Rules) आयकर कायद्याच्या कलम 271 D मध्ये देखील या संदर्भात महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. या कलमानुसार, एका दिवशी २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीने व्यवहार केलेल्या रकमेवर दंड भरावा लागतो. त्यामुळे, २ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे सोने खरेदी करताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे.
.. तर दंडात्मक कारवाई होईल
जर एखाद्या ज्वेलरने या नियमाचे उल्लंघन करून ग्राहकाकडून २ लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम कॅशने स्वीकारली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते. (Gold Buying Rules) अर्थात, जर एखाद्या ग्राहकाने २ लाखांपेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी केले आणि ही रक्कम त्याने कोणत्याही ओळखपत्राशिवाय म्हणजेच आधार वा पॅनचा पुरावा न देता दिली तर संबंधित ज्वेलर्सवर दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये त्याला ३ लाख रुपयांचा दंडदेखील भरावा लागू शकतो.
ओळखपत्र देणे बंधनकारक
तुम्ही २ लाख वा त्याहून अधिक रकमेचे सोने खरेदी करत असाल तर ज्वेलर्सला पॅन तपशील देणे बंधनकारक आहे. नियमानुसार, या व्यवहारासाठी तुम्ही कॅश वा ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर जरी केला तरीही २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर ओळखपत्र देणे अनिवार्य आहे. (Gold Buying Rules)