Gold Loan : देशातील ‘या’ खाजगी बँका देतायत स्वस्तात गोल्ड लोन; पहा किती मिळणार इंटरेस्ट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gold Loan) भारतात सर्वाधिक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देतात. सोन्यात केलेली गुंतवणूक ही अडीअडचणीत मदतीला येते. सध्या कमकुवत यूएस आर्थिक डेटामुळे या आठवड्यात सोन्याची किंमत ६६ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतकी विक्रमी उच्चांकावर आहे. अशावेळी जर कुणाला सोने विकायचे असेल किंवा गहाण ठेवायचे असेल तर ही वेळ चांगली ठरू शकते. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सहाय्याची गरज असते. अशावेळी सोन्यातील गुंतवणूक एक चांगला पर्याय ठरते. म्हणूनच देशातील काही खाजगी बँका कमी दरात गोल्ड लोन ऑफर करत आहेत. चला तर या बँकां कोणत्या आणि त्यांचे व्याजदर किती आहेत? याविषयी माहिती घेऊया.

HDFC बँक

खाजगी क्षेत्रात HDFC बँक ही मोठी बँक मानली जाते. ही बँक ग्राहकांना ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ८.५ टक्के इतका व्याजदर आकारते आहे. या कर्जासाठी २ वर्षांसाठी कालावधी प्रदान केला जाईल. ज्यामध्ये तुम्हाला मासिक हप्ता २२,५६८ रुपये इतका भरावा लागेल.

युनियन बँक ऑफ इंडिया (Gold Loan)

युनियन बँक ऑफ इंडियादेखील सर्वात स्वस्त गोल्ड लोन देत आहे. ही बँक ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ८.७ टक्के व्याजदर आकारते आहे. या कर्जासाठी २ वर्षांचा कालावधी प्रदान केला जात आहे. या कर्जासाठी तुम्हाला मासिक हफ्ता २२,६१० रुपये इतका भरावा लागेल.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियातर्फे ग्राहकांना ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ८.८ टक्के व्याज आकारला जात आहे. याचा कालावधी २ वर्षांचा असून मासिक हफ्ता २२,६३१ रुपये इतका असेल. (Gold Loan)

इंडियन बँक

माहितीनुसार, इंडियन बँकदेखील स्वस्त दरात गोल्ड लोन देत आहे. यासाठी २ वर्षांचा कालावधी प्रदान केला जात आहे. ज्यामध्ये ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ८.६५ टक्के व्याजदर आकारला जात आहे. यामध्ये तुमचा मासिक हप्ता २२,५९९ रुपये इतका असेल.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा या बँकेकडून ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ९.४ टक्के व्याजदर आकारला जात आहे. (Gold Loan) याचा कालावधी २ वर्षांचा असून मासिक हफ्ता २२,७५६ रुपये इतका असेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे २ वर्षांसाठी गोल्ड लोन दिले जात आहे. यात ५ लाख रुपयांच्या लोनवर ९.६ टक्के व्याजदर आकारले जात आहे. या लोनचा मासिक हफ्ता २२,७९८ रुपयांचा असेल.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकतर्फे ग्राहकांना ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ९.२५ टक्के व्याजदर आकारला जात आहे. याचा कालावधी २ वर्षांचा असून मासिक हफ्ता २२,७२५ रुपये इतका असेल.

कॅनरा बँक

(Gold Loan) कॅनरा बँकदेखील ग्राहकांना स्वस्त व्याजदरासह २ वर्षांसाठी गोल्ड लोन देत आहे. ही बँक ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर ९.२५ टक्के इतका व्याजदर आकारते आहे. या कर्जासाठी मासिक हफ्ता २२,७२५ रुपये इतका असेल.

आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय (ICICI) बँक ग्राहकांना ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर १० टक्के व्याजदर आकारते आहे. या कर्जाचा कालावधी हा २ वर्षांचा असेल आणि मासिक हफ्ता २२,८८२ रुपये इतका असणार आहे.

ॲक्सिस बँक

ॲक्सिस बँकेकडून ५ लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर कर्जदाराला १७ टक्के व्याजदर आकारला जातो. या कर्जाचा कालावधी हा २ वर्षांचा सून मासिक हफ्ता २४,३७६ रुपये इतका असेल. (Gold Loan)