हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today – काही महिन्यापासून सोन्याच्या किंमती मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. सोन्याने तर आपली मजल मोठी गाठली असून, मागील दहा-बारा दिवसात एकूण 3,000 रुपयांनी महागले आहे. चांदीनेही मोठा दरवाढीचा अनुभव घेत, हजार रुपये वाढले आहेत. हे सर्व बदल ऐन लग्नसराईच्या काळात वधू-वर मंडळींना मानसिक ताण देऊन गेले आहेत. पण या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर चला जाणून घेऊयात या किमती कितीने कमी झाल्या आहेत .
दर कमी झाले (Gold Price Today) –
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत एक लहानशी घसरण झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत 170 रुपयांची कमी झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. तसेच चांदीच्या भावातही मोठा बदल झाला आहे. 18 ते 23 जानेवारीदरम्यान किंमती स्थिर राहिल्या, पण 24 जानेवारीपासून किंमतीत 1,000 रुपयांची वाढ दिसून आली. 27 जानेवारी रोजी चांदीच्या किमतीत 1,000 रुपयांची घट झाली असून, एक किलो चांदीची किंमत आता 96,500 रुपये आहे.
सोने आणि चांदीच्या किमतीत आज काय आहे –
ज्वेलर्स असोसिएशननुसार, (Gold Price Today) 24 कॅरेट सोने 80,397 रुपये, 23 कॅरेट सोने 80,075 रुपये, 22 कॅरेट सोने 73,644 रुपये, 18 कॅरेट सोने 60,298 रुपये, आणि 14 कॅरेट सोने 47,032 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,274 रुपये आहे. सोने आणि चांदीच्या किमती घरबसल्या जाणून घेण्यासाठी, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे ताजे भाव तपासता येऊ शकतात. तसेच ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटच्या किमती जाणून घेऊ शकतात.
हे पण वाचा : बापरे !! आता कोरोनासारखी आणखी एक महामारी? बिल गेट्स यांनी दिला चिंतेचा इशारा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज




