हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या आधुनिक युगात मोबाईलचा वापर प्रचंड वाढला असून, तो आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेकजण वेगवेगळ्या प्लॅनसाठी दोन सिम कार्ड्सचा वापर करत असतात. तर काहीजण एकाच फोनमध्ये डबल सिम वापरतात, तसेच अजूनही अनेक वापरकर्ते 2G सेवा घेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून डबल सिम किंवा 2G सेवा घेणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली आहे. तर चला जाणून घेऊयात या निर्णयांबद्दल अधिक माहिती.
ट्रायच्या नव्या गाईडलाइन्सची तयारी –
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी Voice + SMS पॅक उपलब्ध करून देण्यास सांगणार आहे. यासाठी लवकरच नव्या गाईडलाइन्स जारी केल्या जाऊ शकतात. अनेकजण दोन सिम वापरत असले तरी, एकाच सिमवर इंटरनेटसह सर्व सेवा घेतात, तर दुसऱ्या सिमचा वापर फक्त व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी होतो. पण सध्याच्या पॅक्समुळे ग्राहकांना फक्त व्हॉईस आणि एसएमएससाठीही महागडे रिचार्ज करावे लागतात. यावर उपाय म्हणून ट्राय नवीन गाईडलाइन्स आणण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात जवळपास 30 कोटी 2G ग्राहक आहेत, जे केवळ व्हॉईस आणि एसएमएस सुविधांचा उपयोग करतात.
OpenSignal अॅप –
जर तुम्हाला फसवणूक कॉल्स किंवा मेसेज येत असतील, तर तुम्ही संचार साथी पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता. तसेच जर 10 अंकी मोबाइल नंबरवरून तुम्हाला स्पॅम मेसेज आला, तर तुम्ही 1909 या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता. यामुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच तुमच्या भागात कोणत्या टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क अधिक चांगले आहे हे तपासण्यासाठी OpenSignal अॅप वापरू शकता. हे अॅप नेटवर्कची गती, कव्हरेज आणि इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती देते. BSNL, Jio, Airtel, Vodafone Idea यापैकी कोणाचे नेटवर्क चांगले आहे, याचा त्वरित अंदाज हे अॅप देऊ शकते.
योजना फायदेशीर ठरणार –
नव्या गाईडलाइन्समुळे ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि केवळ व्हॉईस व एसएमएससाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. तसेच डबल सिम वापरणाऱ्यांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार आहे.