Google Office In Pune : Google चं पुण्यातील नवं ऑफिस पाहालं तर म्हणाल, माझंही ऑफिस असंच हवं होत!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Google Office In Pune) दिवसभरातला सगळ्यात जास्त वेळ आपण आपल्या ऑफिसमध्ये घालवत असतो. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, काम करता करता थोडासा निवांत वेळसुद्धा मिळावा. मग दुपारच्या जेवणाची वेळ असो किंवा त्यानंतरची वामकोक्षी. पण शक्यतो असं कोणत्याही ऑफिसमध्ये आराम मिळत नाही आणि त्यामुळे कामातच राम म्हणत प्रत्येक कर्मचारी सुटण्याची वेळ पाहत असतो. पण गुगलच्या ऑफिसमध्ये असं नाहीये बरं का!! नुकतच गुगलने पुण्यामध्ये नवकोरं ऑफिस सुरू केलं आहे. गुगलचं हे भारतातील पाचवं ऑफिस असून त्याचे हेडक्वार्टर्स मात्र हैदराबादमध्ये आहे.

गुगलच्या प्रत्येक ऑफिसमधल्या सुविधा या अगदी ड्रीम ऑफिससारख्या आहेत. अशातच आता पुण्यातील गुगलच्या ऑफिसचा हा व्हायरल होणार व्हिडीओ पाहालं तर तुम्हालाही वाटेल की, आपलं ऑफिस असं असायला हवं. (Google Office In Pune) कोरेगाव पार्क एनएक्स मध्ये गुगलचं हे नवं कोरं ऑफिस उघडण्यात आलं आहे. या ऑफिसचे इंटिरियर इतके लक्षवेधी आहे की, सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांना या ऑफिसचे आकर्षण वाटू लागले आहे. हे ऑफिस आतून नेमकं कसं आहे? याचा व्हिडिओ इथे काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव हर्ष गोयल असे असून हा या ऑफिसमधील कर्मचारी आहे. त्यानेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Google Office In Pune) ज्यामध्ये त्याने ऑफिसमधील अमेनिटीज दाखवल्या आहेत. गुगलच्या पुण्यातील या नव्या ऑफिसमध्ये तब्बल १३०० कर्मचारी काम करू शकतात, असे गुगलने सांगितले होते. आता या ऑफिसचा हा व्हिडिओ पाहून १३०० काय त्याहून जास्त कर्मचारी इथे काम करू शकतील असं वाटतंय.

(Google Office In Pune)या इंजिनिअरने आपल्या ऑफिसमधील सोयीसुविधा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ज्यात कॅफे, गेमिंग झोन, रि- क्रिएशन रूम आणि अत्यंत आकर्षक अगदी मनोवेधक असं इंटिरियर केलेलं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडिओवर अनेक लोकांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ गेल्या ३ दिवसांपासून व्हायरल होतो आहे. जो आत्तापर्यंत ५ लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेक नेटकरी गुगलचं हे ऑफिस पाहून त्याचं कौतुक करत आहेत. तर अनेकांनी इथे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर काही लोकांनी ‘आमचंही ऑफिस असंच हवं होतं’, अशी इच्छा व्यक्त केली आहे.