Google Pixel 9a: Google Pixel 9a स्मार्टफोन लाँच; पहा फीचर्स अन किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pixel 9a – Google ने भारतात आपल्या Pixel सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Pixel सीरीजच्या मिडरेंज A-Series अंतर्गत ओळख करून दिला आहे. नवीन Pixel 9a स्मार्टफोनमध्ये, मागील वर्षी 2024 मध्ये लाँच झालेल्या Pixel 9 Series मध्ये असलेला चिपसेट देण्यात आला आहे. Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 48MP प्राथमिक रियर कॅमेरा देण्यात आले आहे. यामध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी आहे. हा फोन नवीन Android 15 सोबत येतो आणि कंपनीचा दावा आहे की, याला 7 वर्षांपर्यंत OS आणि सुरक्षा अपडेट मिळतील. तर चला या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Google Pixel 9a चे फीचर्स –

Google Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच (1080×2424 पिक्सल) Actua (POLED) डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये 60Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 2700 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देतो आणि Gorilla Glass 5 ने संरक्षण करण्यात आले आहे. हा फोन ड्यूल सिम सपोर्ट आणि Android 15 सोबत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये चौथ्या पिढीचा Tensor G4 चिपसेट आहे. या डिव्हाइसमध्ये Titan M2 सिक्योरिटी कोप्रोसेसर देखील दिला आहे. यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे, पण स्टोरेज वाढवण्याचा पर्याय नाही.

कॅमेरा सेटअप –

कॅमेरासाठी, Pixel 9a मध्ये F/1.7 अर्पचर, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, आणि 1/2-इंच सेन्सर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राथमिक रियर कॅमेरा सेटअप आहे. या कॅमेरामध्ये 8x पर्यंत Super Res Zoom सपोर्ट आहे. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. गूगलने या स्मार्टफोनमध्ये अनेक कॅमेरा फीचर्स दिले आहेत, ज्यामध्ये Macro Focus, Add Me, Night Sight, Magic Eraser, Best Take, Photo Unblur, आणि Portrait Light यांचा समावेश आहे. रियर कॅमेरा 4K/60fps वर शूटिंग करू शकतो आणि 5x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा 4K/30fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो.

बॅटरी आणि चार्जिंग –

Pixel 9a मध्ये 5100mAh बॅटरी आहे जी 23W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यासोबतच 7.5W वायरलेस (Qi) चार्जिंगची सुविधा देखील आहे. गूगलचा दावा आहे की, ह्या फोनला एकाच चार्जमध्ये 30 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. Extreme Battery Saver मोडमध्ये 100 तासांची बॅटरी लाइफ मिळू शकते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.

Google Pixel 9a कनेक्टिविटी –

Pixel 9a मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, NFC, GPS, आणि USB 3.2 Type-C पोर्ट देण्यात आले आहेत. यामध्ये स्टीरियो स्पीकर्स आणि दोन मायक्रोफोन्स आहेत. ह्या डिव्हाइसमध्ये एक्सीलेरोमीटर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, बॅरोमीटर, लाइट सेन्सर, आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील दिले आहेत.

किंमत –

Google Pixel 9a स्मार्टफोन भारतात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये आहे. हा फोन आयरिस, ऑब्सिडियन, पीयनी आणि पोर्सिलन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. गूगलने सांगितले की, Pixel 9a स्मार्टफोन एप्रिलमध्ये भारतातील रिटेल पार्टनर्सकडून विक्रीसाठी उपलब्ध होईल.