ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! सरकारकडून 350 कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याला मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या साठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. 350 कोटी रुपयांच्या अर्थ अर्थसाहाय्याला राज्य सरकार कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाला आता काहीसा दिलासा मिळाला असून यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर 2024 महिन्यासाठी सवलत मूल्याची रक्कम शासनाकडं विनंती केली होती. महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्रकाच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने एसटी महामंडळासाठी 350 कोटी रुपयांची निधी मंजुरी करून दिवाळीपूर्वी ही रक्कम वितरित करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर सुविधांसाठी देखील मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त या निधी वितरणासाठी प्राधिकृत करण्यात आले असून त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी यांना ही रक्कम एस टी महामंडळात तातडीने वितरित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी वेतनाची हमी मिळणार आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी येणारी दिवाळी ही आनंदाने साजरी करता येणार आहे.