सरकारने 71 हजाराहून जास्त SIM Cards ब्लॉक; कारण काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिमकार्ड वापरकर्त्यांकसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आंध्र प्रदेश अन तेलंगणामध्ये तब्बल 71,000 पेक्षाही जास्त सिमकार्ड ब्लॉक केलेत. हि ब्लॉक केली सिमकार्डस फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येत होती. या कार्ड्सचा वापर गुन्हेगार विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीसाठी करत होते, याची माहिती टेलिकम्युनिकेशन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी या फसवणुकीला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. विभागाने यासाठी अत्याधुनिक AI आणि फेसियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक करणाऱ्या लोकांना ओळखले. अन त्यानंतर त्यांनी 71,000 हुन अधिक सिमकार्ड ब्लॉक केली.

पॉइंट ऑफ सेल एजंट्सचा वापर –

गुन्हेगार हि फसवणूक करण्यासाठी PoS (पॉइंट ऑफ सेल) एजंट्सचा वापर करून सिमकार्ड प्राप्त करत होते. तसेच यातून हे स्पष्ट झाले आहे कि , ते खोटी ओळखपत्रे दाखवून सिमकार्ड मिळवत आणि याद्वारे लोकांकडून पैसे उकळत होते. यासाठीच सरकारने सर्व नागरिकांना या प्रकारच्या फसवणुकीसाठी अधिक जागरूक होण्यास सांगितले आहे. याचसोबत कोणाला कोणतीही शंका असल्यास लगेच संचार साथी पोर्टल (Sanchar Saathi) किंवा 1930 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले गेले आहे.

फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न –

DOT ने स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्व फसवणुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अत्याधुनिक AI आणि फेसियल रिकग्निशन सोल्यूशन ‘ASTR’ वापरले जाते. या तंत्रज्ञांच्या माध्यमातून सिमकार्ड धारकांची संपूर्ण माहिती , कोणत्याही व्यक्तीने एकाच नावावर तसेच पत्त्यावर किती सिमकार्डस घेतली आहेत , याची संपूर्ण माहिती मिळते.

अधिकाऱ्यांच्या सूचना –

सिमकार्ड हस्तांतरणयोग्य नाहीत.
सिमकार्ड घेतलेल्या व्यक्तीला त्याच्या वापराची जबाबदारी आहे.
अवैधपणे सिमकार्ड मिळवणे हा जामिनाच्या बाहेर असलेला गुन्हा आहे.
नागरिकांनी सिमकार्ड हस्तांतरण किंवा फसवणूक करण्यापासून दूर राहावे.
सिमकार्ड सुरक्षित ठेवणे, योग्य वापर सुनिश्चित करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे.
असामान्य व्यवहार ओळखून त्वरित सूचना देणे आवश्यक आहे.
फसवणूक रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.