government pension : राज्य सरकारचा मोठा निर्णय ! निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार पेन्शन

pension
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

government pension : शासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ घेता येतो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच. पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकार कडून सुधारणा (government pension) करण्यात आली असून त्याची आमलबजावणी राज्यात सुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटीत, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा (government pension) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोणाला मिळणार लाभ? (government pension)

मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी तर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील.

सध्या असलेल्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याचा पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर अविवाहित मुलीच्या बाबतीत ती 24 वर्षाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येते मानसिक अथवा शारीरिक विकलांगता असलेल्या पाल्याला हयात भर कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद आहे.

नक्की काय झाला बदल ? (government pension)

आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती किंवा पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा केली आहे. केंद्र शासनाने केलेल्या सुधारण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने (government pension) हा निर्णय घेतला आहे.