Green Vegetable Benefits : उन्हाळ्यात घामोळं करतं हैराण? आहारात ‘या’ पालेभाजीचा समावेश केल्यास मिळेल आराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Green Vegetable Benefits) उन्हाळ्याच्या दिवसात शारीरिक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. शरीरातील पाणी कमी होणे, घशाला कोरड पडणे, घामाची दुर्गंध. याशिवाय चुकीच्या आहारामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, अतिसार अशा समस्या देखील निर्माण होतात. दरम्यान, गरमी वाढल्याने अनेक लोक त्रस्त होतात ते घामोळ्याच्या समस्येने. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोकांना घामोळे येण्याची समस्या असते.

शरीरातील उष्णता वाढल्यामुळे शरीरावर बारीकसर पुरळ येतो. मग खाज आणि रॅशेशची समस्यादेखील निर्माण होते. अशावेळी आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्याची गरज असते. यासाठी आपल्या आहारात प्रामुख्याने पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश करावा. त्यातही कुल्फा ही भाजी खाणे घामोळ्याच्या समस्येवर परिणामकारक ठरू शकते. (Green Vegetable Benefits)

आजपर्यंत तुम्ही मेथी, पालक अशा पालेभाज्या खाल्ल्या असतील. पण कूल्फा या भाजीविषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. कुल्फा ही भाजी प्रामुख्याने उन्हाळ्यात खाल्ली जाते. ज्यामुळे घामोळे येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. चला तर कुल्फाच्या भाजीविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊयात.

कुल्फा भाजीतील आरोग्यदायी गुणधर्म

पालेभाज्यांमधील कुल्फा भाजी ही सर्वसामान्यपणे घोळाची भाजी म्हणून ओळखली जाते. ज्याला Purslane किंवा Portulaca oleracea म्हणून देखील ओळखले जाते. ही रसाळ पालेदार भाज्यांपैकी एक अशी हिरवी भाजी आहे. ही भाजी विविध भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उपलब्ध होते. (Green Vegetable Benefits) ही भाजी अत्यंत पौष्टिक असून यामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक खनिजे असतात. तसेच या भाजीत ओमेगा – 3 फॅटी ऍसिडदेखील पुरेशा प्रमाणात असते.

कुल्फा भाजी खाण्याचे फायदे (Green Vegetable Benefits)

1. शरीराला हायड्रेट ठेवते

उन्हाळ्यात घोळाची भाजी खाण्याचा अत्यंत महत्त्वाचा फायदा असा की, ही भाजी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ञ सांगतात या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराबाहेर जो घाम बाहेर पडतो त्यावाटे शरीरातील कमी होणारे पाणी या भाजीच्या सेवनाने भरून काढण्यास मदत होते.

2. शरीराचे तापमान संतुलित राहते

कुल्फा अर्थात घोळच्या भाजीचे सेवन केल्यास निर्जलीकरण टाळता येते. परिणामी शरीर थंड राहते. यामुळे उष्माघात आणि घामोळे यासारख्या उष्णतेशी संबंधित आजारांवर घोळची भाजी परिणामकारक ठरते. (Green Vegetable Benefits) इतकेच नव्हे तर शरीराचे तापमान संतुलित राहिल्याने उष्ण हवामानातदेखील ताजेतवाने वाटू शकते.

3. घामोळ्याच्या समस्येपासून सुटका

उन्हाळ्याच्या दिवसात घोळच्या भाजीचे सेवन केल्यास शरीराचे तापमान संतुलित राहते. शिवाय शरीर डिहायड्रेट होत नाही. परिणामी, उष्णतेमुळे किंवा शरीराचे तापमान वाढल्यामुळे होणाऱ्या शारीरिक समस्या टाळता येतात. जसे की, पोटात उष्णता वाढल्याने होणारे त्रास, डोकेदुखी, मळमळ आणि मुख्य म्हणजे घामोळे. जर तुम्हालाही उन्हाळ्यात घामोळे येत असेल तर तुमच्या आहारात प्रामुख्याने घोळच्या भाजीचा समावेश करा.

4. इतर फायदे

(Green Vegetable Benefits) उन्हाळ्याच्या दिवसात सहज उपलब्ध होणारी ही भाजी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. इतकेच काय तर या भाजीत कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन व्यवस्थापन आणि पाचक आरोग्यासाठी ही भाजी उत्तम मानली जाते.

‘असे’ सेवन करा

कुल्फा म्हणजेच घोळाच्या भाजीचे सेवन करण्यासाठी आधी भाजी स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. अर्थात त्यावरील घाण, माती अथवा कीड लागलेली पाने काढून टाकून ती पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुम्हाला आवडेल तसे या भाजीचे सेवन करू शकता. या भाजीचे तुम्ही सॅलेडमध्ये कच्च्या स्वरूपात सेवन करू शकता. तसेच स्टिर-फ्राइज, सूप किंवा करीसारख्या विविध पदार्थांमध्येदेखील तुम्ही या भाजीचे सेवन करू शकता. (Green Vegetable Benefits)