Hair Care : केसांना तेल लावताना फक्त ‘या’ गोष्टी सांभाळा; केसगळती थांबेल अन् कोंडा होईल छूमंतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) सौंदर्याच्या व्याख्येमध्ये लांब सडक, काळेभोर, सुंदर आणि घनदाट केसांचा उल्लेख हा असतोच. ज्या मुलींचे केस लांब आणि काळे असतात त्या मुलींच्या सौंदर्याला काही तोडच नसते, असं म्हणतात ते उगीच थोडी! पण आजकाल चुकीची जीवनशैली आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच केसांच्या आरोग्यावर देखील परिणाम करते आहे. यामध्ये केसांचे होणारे नुकसान अक्षरशः जिव्हारी लागणारे असते.

सुंदर केस कोणाला नको असतील? पण बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्यात येणाऱ्या चुकीच्या पदार्थांमुळे केसांचे आरोग्य दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसून येत आहे. (Hair Care) त्यात अनेकांना केसांना तेल लावणे ओल्ड फॅशन वाटते. तर काहींना केसांना तेल लावायचा कंटाळा येतो. पण आज आम्ही तुम्हाला केसांना तेल लावण्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःहून केसांना तेल लावाल.

आठवड्यातून २ ते ३ वेळा हेअर ऑइलिंग कराचं

सौंदर्य तज्ञ सांगतात की, आठवड्याभरातून किमान २ ते ३ वेळा केसांना तेल लावायला हवे. यामुळे होतं काय? तर केसांना वेळोवेळी मॉइश्चरायझेशन मिळतं. परिणामी त्यांची वाढ होते. (Hair Care) शिवाय तुमचे केस कोरडे झाले असतील तर तुमच्या केसांमधला मुलायमपणा परत येतो. केसगळतीसुद्धा थांबते. दरम्यान, जर तुमचे केस आधीच तेलकट असतील तर आठवड्यातून दोनदा तेल लावणे पुरेसे आहे. मात्र, तुमचे केस जर कोरडे असतील तर आठवड्यातून दोन, तीन वेळा किंवा अगदी चार वेळा तेल लावणेसुद्धा फायदेशीर ठरू शकते.

तेल लावण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या (Hair Care)

अस्वच्छ केसांना ऑइलिंग करू नका – केसांना तेल लावण्यापूर्वी आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तेलातील पोषक घटकांचा थेट टाळूवरील त्वचेवर परिणाम होत असतो. अशावेळी अस्वच्छ केसांना तेल लावल्यास कोंडा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच अस्वच्छ केसांना तेल लावू नये असे तज्ञ असतात.

केस धुण्यापूर्वी तेल लावा – (Hair Care) आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केस धुवत असाल तर जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्याच्या किमान एक- दोन तास आधी केसांना ऑइलिंग जरूर करा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसांचे आपोआप मॉइश्चरायझेशन होते. मुख्य म्हणजे तेल लावल्यानंतर केस धुतल्याने केस गळती सुद्धा थांबते.

कोमट तेलाचा वापर करा – जर तुम्ही केसांना योग्य पोषण द्रव्य देण्यासाठी कोमट तेलाचा वापर केलात तर अधिक फायदा होतो. त्यामुळे केस निरोगी राहतात. केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केसांची वाढदेखील झपाट्याने होते. याशिवाय अकाली पिकणाऱ्या केसांपासून सुटका मिळते. (Hair Care)