Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो कृषी नावाच्या स्टार्टअपने यासाठी shop.hellokrushi.com नावाची वेबसाईट सुरु केली आहे.

महाराष्ट्रातील तब्बल २ लाख शेतकऱ्यांसोबत हॅलो कृषी काम करत आहे. शेतीविषयक मार्गदर्शनापासून ते शेतमालाच्या विक्रीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेत हॅलो कृषी आपल्या शेतकऱ्यांना सहकार्य करत आहे. हॅलो कृषी अंतर्गत एकूण ९० हजार एकर जमीनीवरील शेतमाल थेट शेतकऱ्याच्या वावरातून ग्राहकांच्या दारात पोहोचवला जातो. यामुळे शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचा फायदा होतो आहे. याचाच एक भाग म्हणून हॅलो कृषी आपल्या कोकणातील शेतकऱ्यांसाठी हापूस आंबा विक्रीसुद्धा सुरु केली आहे. यातून ग्राहकांना खात्रीशीर ओरिजिनल हापूस आबा तर उपलब्ध होतो आहेच पण त्यासोबतच शेतकऱ्यांनाही यामुळे थेट चांगला मोबदला मिळतो आहे.

हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

तुम्हाला जर हॅलो कृषीच्या कोकणातील शेतकऱ्यांकडून हापूस आंबा ऑर्डर करायचा असेल तर तुम्हाला अगोदर shop.hellokrushi.com असं गुगलवर सर्च करावं लागेल किंवा गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello krushi नावाचे अँप डाउनलोड करावे लागेल. इथे तुम्हाला शेतकरी दुकान अंतर्गत ग्रेड नुसार पाहिजे त्या साईजचे आंबे निवडून ऑनलाईन ऑर्डर करता येईल. विशेष म्हणजे तुम्हाला हे आंबे होम डिलिव्हरी मिळत आहेत.

खरा देवगड हापूस आंबा कसा ओळखायचा?

अनेकदा बाजारात देवगडच्या नावाखाली कर्नाटकी हापूस विकला जातो. दिसायला हुबेहूब देवगड हापूस सारखा असणारा हा आंबा चवीला मात्र अजिबात देवगड हापूस सारखा नसतो. मात्र ज्यांनी आजवर देवगडची चवच पाहिली नाही त्यांना हा आंबा स्वस्तात मस्त वाटतो अन आपली फसवणूक झालीय हे सुद्धा लक्षात येत नाही. खऱ्या देवगड हापूस आंब्याची साल पातळ असते. शिवाय देवगड हापूस आंब्याला थोडासा लाल रंग पिकताना येतो. आतमधून संपूर्ण डार्क ऑरेंज कलर येतो. याची कोय सुद्धा आकाराने लहान असते.