Hardeek Joshi : काका मला वाचवा!!! मदतीसाठी हार्दिक जोशी घालतोय आर्त साद; नेमका काय आहे हा प्रकार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hardeek Joshi) झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी प्रकाशझोतात आला. या मालिकेत त्याने साकारलेलं राणा दा हे पात्र तुफान गाजलं. आजही त्याचे चाहते त्याला हार्दिक पेक्षा जास्त राणा दा याच नावाने ओळखतात. हार्दिक जोशीचा चाहता वर्ग मोठा असून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत त्याचे चाहते कायम उत्सुक असतात. अशातच आता प्रेक्षकांचा लाडका राणा दा ‘काका मला वाचवा…’ अशी आर्त साद घालतोय. चला तर जाणून घेऊया नेमका हा प्रकार काय आहे?

अभिनेता हार्दिक जोशीचा एक नवा सिनेमा येतोय. ज्यामध्ये हार्दिक पुतण्या तर अभिनेते सुनील अभ्यंकर हे काकाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लॉकडाऊन लग्न’ असे असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि सुनील अभ्यंकर एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटातून हि धमाल काका पुतण्याची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. पण आता या गोष्टीतला पुतण्या ‘काका मला वाचवा’ असं का म्हणतोय? या प्रश्नाचं उत्तर ८ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये मिळणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अमोल कागणे प्रस्तुत ‘लॉकडाऊन लग्न’ या आगामी चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. तर सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (Hardeek Joshi) तसेच अमोल गोळे यांनी चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं अगदी स्पष्ट होतं आहे. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्यानं काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात काही शंका नाही.

(Hardeek Joshi)अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेते सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. त्यामुळे काका- पुतण्याच्या भूमिकेत ही नवी जोडी नक्कीच या चित्रपटात धमाल उडवून देणार यात काही वाद नाही. आता हा काका पुतण्याच्या मदतीला कसा जाणार? आणि पुतण्यासाठी काय करणार? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या ८ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हार्दिक जोशी ‘काका मला वाचवा’ अशी साद नेमकी का घालतोय याचं उत्तरं मिळण्यासाठी थोडे दिवस आणखी थांबावं लागणार आहे.