जेवण चांगल्या प्रकारे बनवायचं असेल तर छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. थोडीशी जरी गडबड झाली तर पदार्थाच्या स्वादावर परिणाम म्हणून पदार्थ बिघडतो. बरेचदा चुकून आपल्या हातून जेवणामध्ये तिखट जास्त पडते. मात्र त्या वेळेला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत असं जेवण खाताना त्यांना त्रास होतो. मग अशावेळी काय करायचं पदार्थासाठी कल्पना कसा कमी करायचा हे जाणून घेऊयात
डेअरी प्रोडक्ट
भाजी मधला तिखटपणा कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये दूध दही किंवा तुम्ही तुम्ही घालू शकता. डेरी प्रॉडक्ट हे फक्त तिखटपणा कमी करत नाही तर ग्रेव्ही अधिक दाट बनवतात. हे डेअरी प्रोडक्ट घालणार आहात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस मंद आचेवर असला पाहिजे.
तूप
सुक्या भाजीमध्ये जर तिखट जास्त झालं तर भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये तूप घाला आणि भाजी थोडा वेळ शिजू द्या. तूप भाजी मधला तिखटपणा कमी करेल.
साखर
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पदार्थांमधील तिखटपणा कमी करण्यासाठी साखर चांगल्या प्रकारे काम करते. तुम्ही बनवलेला पदार्थ तिखट झाला असेल तर त्यामध्ये साखरेचे पाणी घाला. पण हे घालत असताना जास्त प्रमाणात घालू नका नाहीतर पदार्थाची चव बिघडून जाईल.