कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजयी षटकार ; समरजितसिंह घाटगे यांचा पराभव

hasan mushreef
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील लढत ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. एकीकडे पाच वेळा विजयी झालेले हसन मुश्रीफ आणि दुसरीकडं समरजीतसिंह घाटगे अशी लढत होती. मात्र हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11,609 मतांनी पराभव करत विजय खेचून आणला आहे.

हसन मुश्रीफ यांना यावेळची लढत ही खूप प्रतिष्ठेची होती कारण अजित पवार गटामध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यानी अत्यंत आक्रमकपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच समरजितसिंह घाटगे यांना पाठबळ दिलं होतं. त्यामुळे कागलची लढाईकडे अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जवळपास 28 हजार मतांनी हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी मताधिक्य कमी झालं असले तरी विजय मिळवण्यात मात्र ते यशस्वी ठरले आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी असलेले समर्जीत घाटगे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. कागलच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं. शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या होत्या जयंत पाटील यांनी सुद्धा दोन सभा घेतल्या होत्या त्यामुळे कागल मधला वातावरण चांगलं तापलं होतं अखेर हसन मुश्रीफ यांचा विजय निश्चित झाला आहे.