Haunted Places : मुंबईतील ‘या’ ठिकाणी आहे भुतांचा वावर; रात्री काय दिवसाही जायची हिंमत होणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haunted Places) आज पर्यंत तुम्ही अनेक भूतांच्या कथा ऐकला असाल. वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा अनेक भूतांच्या विविध दंतकथा सांगितल्या जातात. काही ठिकाणी तर भूतांचा ठराविक कालावधी असतो असेही म्हटले जाते. तर काही ठिकाणी गेलेल्या माणसाला झपाटल्याशिवाय भूत काही सोडत नाहीत, असेही सांगतात. यातील अनेक ठिकाणांविषयी तुम्हाला माहीती असू शकते. तर काही ठिकाणांबाबत तुम्ही अजूनही अनभिज्ञ असाल.

जसं की झगमगणारी मुंबई. मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. इथे हजारो, लाखो लोक पैसा कमावण्यासाठी येत असतात. मुंबईत अनेक अशी ठिकाण आहेत जी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र याच मुंबईत अशीही काही ठिकाण आहेत जिथे आजही भूतांचा वावर असल्याचं अनेक जाणकार सांगतात. होय. आपल्या मुंबईतसुद्धा भुतं असल्याचं काही स्थानिकांचं म्हणणं आहे. तसे अनुभव आल्याचे हे लोक सांगतात. यांपैकी काही ठिकाणांबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया मुंबईतील हॉंटेड जागा.

1) बॉम्बे हायकोर्ट (Haunted Places)

मुंबईतील चर्चगेट आणि फोर्ट विभागात अनेक मोठमोठ्या इमारती आहेत. जिथे अनेक कार्यालय आहेत. मात्र संध्याकाळी 7 नंतर ही कार्यालये सुटल्यावर इथला परिसर अत्यंत शांत होतो. ब्रिटिशांनी त्यांच्या काळात मुंबईत अनेक वास्तू उभारल्या. त्यांपैकी एक म्हणजे बॉम्बे हायकोर्टची इमारत. ही वास्तू जितकी जुनी आहे तितकीच या वास्तुबद्दल सांगितली जाणारी ही भुताची गोष्ट जुनी आहे.

इथे उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी किंवा आसपासच्या परिसरात टॅक्सी चालवणारे चालक असं सांगतात की, बॉम्बे हायकोर्टात रात्रीच्या वेळी टाईपराईटर वाजल्याचा आवाज येतो. आता हा टाईपराईटर नक्की कोण वापरतं? आणि आणि त्याचा आवाज इतका कसा येतो? हे एक गूढ आहे. जे अद्याप कुणीच उघड करू शकलं नाही.

2) मुकेश मिल, कुलाबा

कुलाबा परिसरातील मुकेश मिल ही खूप जुनी आहे. काही वर्षांपूर्वी या मिलला आग लागली होती आणि आणि या आगीत अनेक लोकांचा जीव गेला होता. शिवाय संपूर्ण मिल जळून खाक झाली होती. तेव्हापासूनच ही मिल बंद आहे. (Haunted Places) आज या ठिकाणी अनेक हॉरर चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते. मात्र रात्रीच्या वेळी इथे कोणतीही महिला जात नाही. कारण या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना भूत झपाटल्याशिवाय सोडत नाहीत, अशी इथली आख्यायिका आहे.

3) डिसोजा चाळ, माहीम

माहीमची डिसूजा चाळ भुतांचा वावर असलेलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे असे म्हटले जाते. या ठिकाणी पूर्वीच्या काही एक विहीर होती. ज्या विहिरीत एक महिला पाणी भरत असताना अचानक विहिरीची भिंत कोसळली. दरम्यान पाणी भरत असलेली महिला विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. ((Haunted Places)) अगदी तेव्हापासून विहिरीत पडून मृत्यू झालेली ती महिला भुताच्या स्वरूपात त्याच विहिरीत वास्तव्यास असल्याचं लोक सांगतात. अनेकांना तिच्या असण्याचा अनुभव आल्याचेदेखील म्हटले जाते.

4) नासीरनजी वाडी, माहीम

माहीम रेल्वे स्थानकाजवळ नासीरनजी वाडी आहे. जी एक झपाटलेली जागा असल्याचे सांगितले जाते. ही जागा नारसी नावाच्या एका पारशी माणसाची होती. ज्याचा जाळून खून करण्यात आला होता. तेव्हापासून इथे नारसी भटकत असल्याची आख्यायिका आहे. दररोज रात्री तो आपल्या जागेची पाहणी करायला येतो असे अनेक स्थायिकांचे म्हणणे आहे. आजपर्यंत रात्रीच्या वेळी इथे गेलेल्या सात ते आठ लोकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. त्यामुळे लोक इथे जायला घाबरतात.

5) एसएनडीटी कॉलेज, जुहू

(Haunted Places) जुहूमधील एसएनडीटी कॉलेजच्या शिक्षक वसाहतीत दररोज रात्री २ वाजण्याच्या सुमारास मोठमोठ्याने पाढे बोलत असल्याचा आवाज येतो. हा आवाज येथील अनेक स्थानिकांनी ऐकला आहे. (Haunted Places) काही विद्यार्थ्यांनी या आवाजाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हे पाढे कोण बोलतं? याचा कुणालाच आजपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही. हा आवाज एका महिला शिक्षिकेचा असल्याचं इथले स्थानिक सांगतात. मात्र ती दिसत नाही हेच या आवाजाचे गूढ आहे.

6) आय सी कॉलनी, बोरिवली

बोरिवलीच्या आयसी कॉलनी प्लॉट नंबर १८ मध्ये एक बगीचा आहे. तो दिसायला सुंदर असला तरी लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जाते. (Haunted Places) इथे जी मुलं खेळायला जातात त्यांना काही ना काही इजा होते, असं निदर्शनास आलं आहे. ही जागा जेव्हा विकली गेली तेव्हा इथल्या माळ्याची नोकरी गेली होती. नोकरी गेल्याच्या दुःखात त्याने इथेच आत्महत्या केली होती. त्यामुळे इथे खेळायला येणाऱ्या मुलांना या माळ्याचं भूत त्रास देतं असं म्हटलं जातं.

7) नॅशनल पार्क, बोरीवली

मुंबईतील बोरिवलीत असणारे संजय गांधी उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क हे घनदाट जंगल, कान्हेरी गुफा आणि जंगली प्राण्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पर्यटनाचे एक स्थळ असून येथे दररोज अनेक लोकांची ये जा असते. (Haunted Places) मात्र, नॅशनल पार्कमध्ये काही गूढ, चमत्कारिक आणि विलक्षण गोष्टी दिसून आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. इथे एका मातीच्या ढिगार्‍यातून रोज पांढऱ्या रंगाच्या कपड्यात असलेली स्त्री प्रवाशांच्या मार्गात येते आणि अडथळा निर्माण करते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळी ६ नंतर कुणालाही आत जाण्याची परवानगी दिली जात नाही.

मित्रांनो, मुंबईतील या सर्व जागा भुताटकीसाठी प्रसिद्ध आहेत. इथे गेलेल्या लोकांना एक तर भूत झपाटतं नाहीतर त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो असे म्हटले जाते. पण मुळात विज्ञान भूत आहेत ही गोष्टचं मान्य करत नाही. शिवाय हे सारे आपल्या मनाचे खेळ असतात आणि आपल्याच विचारांमुळे आपण यामध्ये गुरफटत जातो, असं विज्ञान सांगतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आपण किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वास ठेवायचा नाही हा सर्वस्वी प्रत्येकाचा निर्णय आहे. (Haunted Places)