हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Health Care Tips) संपूर्ण जगभरात तमाम चहा आणि कॉफी लव्हर्स सापडतील. ज्यांची सकाळ हे पेय प्यायल्याशिवाय होत नाही. बरेच लोक सकाळी कडकडीत चहा आणि पेपरसोबत गुड मॉर्निंग म्हणतात. तर बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिऊन गुड नाईट. एकंदरच काय तर बऱ्याच लोकांना ही पेय नुसती आवडत नाहीत तर या पेयांचे व्यसन आहे. तुम्हालाही चहा किंवा कॉफीच्या घोटाशिवाय दिवस अपूर्ण वाटतो? तर ही बातमी तुमच्यासारख्या सगळ्या टी- कॉफी प्रेमींसाठी आहे.
बऱ्याच लोकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतरसुद्धा ही पेय पिण्याची सवय असते. या पेयांची तलफ इतकी तीव्र असते की, काही केल्या घशाखाली घोट गेला नाही तर अनेकदा चिडचिड होते. (Health Care Tips) दरम्यान जर तुम्हालाही जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर चहा वा कॉफी पिण्याची सवय असेल तर सावधान!! तुम्ही तुमच्या आरोग्याचे प्रचंड नुकसान करत आहात. या संदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या काही तज्ञांनी एक संशोधन केले होते. ज्यातून काही महत्वाचे निष्कर्ष काढून सादर करण्यात आले आहे.
चहा आणि कॉफी पिण्यासंदर्भात तज्ञांचा सल्ला (Health Care Tips)
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मार्फत नुकतीच भारतीयांसाठी एकूण १७ आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये, निरोगी जीवनासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. एकूणच मार्गदर्शक तत्वांपैकी एका संशोधनात उत्तेजक पेयासंदर्भात काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधन शाखेतील तज्ञांनी दिला आहे.
ICMR चे तज्ञ काय म्हणाले?
ICMR च्या तज्ञांनी म्हटले की, चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबित्व वाढवते’. त्यामुळे ही पेये पूर्ण बंद करू नये. (Health Care Tips) पण ती पिण्याच्या काही सवयींमध्ये बदल करावा. खास करून जेवण करण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर लागलीच चहा किंवा कॉफी पिऊ नये.
दिवसभरात किती चहा आणि कॉफी प्यावी?
तज्ञ सांगतात की, एक १५० ml कप कॉफीमध्ये ८० ते १२० mg इतके कॅफिन असते. तर इन्स्टंट कॉफीमध्ये ५० ते ६५ mg कॅफीन असते. तसेच इन्स्टंट चहामध्ये ढोबळमाणे ३० ते ६५ mg कॅफिन असते. मात्र, एका दिवसात शरीराला मर्यादेपेक्षा जास्त (३०० mg) कॅफिनचे सेवन करता येत नाही. यामुळे बऱ्याच आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात.
काय दुष्परिणाम होतात?
1. अधिक मात्रेत कॅफीनचे सेवन केल्याने मानवी शरीराला लोह शोषण्याच्या कामात अडथळा येतो. (Health Care Tips) कारण चहा किंवा कॉफी या उत्तेजक पेयांमध्ये टॅनिन नावाचे संयुग असते. ज्याची मात्रा वाढल्याने मानवी शरीराच्या कामात व्यत्यय येते.
2. टॅनिन हे शरीराच्या अन्नातून लोह शोषणाच्या क्रियेत अडथळा आणते. यामुळे खाल्लेल्या अन्नातून रक्तप्रवाहात प्रवेश करणाऱ्या लोहाचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता होते आणि कमी हिमोग्लोबिनची समस्या होऊ शकते.
3. कॅफीनयुक्त पेयांचे अधिक सेवन करणे पेशींच्या कार्यासाठी हानिकारक ठरते. लोहाची पातळी कमी झाल्यामुळे ‘ॲनिमिया’चा धोका वाढतो. ज्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते आणि अशक्तपणा येतो. (Health Care Tips)
4. अधिक कॅफ़िनमुळे शरीरात जाणारे टॅनिन केवळ लोहाची कमतरता निर्माण करत नाही तर शारीरिक ऊर्जा देखील कमी करतात. यामुळे धाप लागणे, वारंवार डोकेदुखी, अशक्तपणा, हृदयाचे जलद ठोके, त्वचा पांढरी फिकट पडणे, नखे ठीसूळ होणे किंवा केस गळणे अशा समस्या होतात.