Health Tips : केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर आरोग्यही सुधारतात ‘हे’ मसाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Health Tips : भारतीय आहारामध्ये मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जेवणाची लज्जत वाढवण्याव्यतिरिक्त मसाल्यांचे आरोग्यासाठी सुद्धा विशेष फायदे आहेत. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये असे काही मसाले आहेत ज्यांचा उपायो आरोग्यासाठी सुद्धा होतो. असे मसाले कोणते आहेत ? त्याचा आरोग्यासाठी काय लाभ आहे ? चला जाणून घेऊया…

आले

आले हे अत्यंत गुणकारी असते. सर्दी खोकल्यामध्ये आल्याचा रस गुणकारी समाजाला जातो. याशिवाय आल्याचे सेवन केल्यामुळे (Health Tips) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत होते.

दालचिनी

दालचिनी हे पचनाच्या विकारांवर उत्तम औषध आहे. सर्दीवर (Health Tips) हा रामबाण उपाय आहे. स्त्री रोगांवर दालचिनी खूप गुणकारी आहे. दालचिनीचा वापर प्रत्येक घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. दालचिनीमध्ये अँटिव्हायरल गुणधर्म आहेत.

धने

यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक (Health Tips) आरोग्य समस्या दूर करतात. पोट फुगण्याच्या समस्येवर धने गुणकारी आहेत.

हिंग

हिंग हा पाचक असतो. पचनासाठी हिंगाचा (Health Tips) वापर जेवणासाठी सुद्धा केला जातो. पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

जिरे

दररोजच्या जेवणाला जिऱ्याची फोडणी नाही असे (Health Tips) होत नाही. जिरे आरोग्यासाठी गुणकारी असतात. जिरे पचनसंस्था निरोगी ठेवतात. शिवाय जिऱ्यामुळे पोटचेविकार दीर होतात.