पुण्यात हेल्मेटसक्ती ? सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विधान भवन इथं रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहन अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ नये त्यासाठी संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करावी यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिली आहे. प्रशासनानं दुचाकी स्वरांसाठी हेल्मेट सक्ती करावी असं देखील त्यांनी बजावले आहे.

याबाबत बोलताना न्यायमूर्ती सप्रे यांनी सांगितलं की निष्पाप नागरिकांच्या रस्ते अपघातात बळींची संख्या लक्षात घेता परिवहन विभाग पोलीस विभाग तसेच सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावं अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक बसवण्याबरोबरच निस्वार्थ भावनेने काम करावं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता सुरक्षा संबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अपघातातील बळींची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. या बैठकीत दिलेल्या निर्देशांक सर्वसामान्यत यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक पालन करावे. वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम स्वयं स्फूर्तीने पाळणे आवश्यक आहे.

वाहतूक नियमांचे पालन करा

रस्त्यावर चालवण्यात येणारे वाहन सुस्थितीत असावं वाहन चालकांनी सीट बेल्ट लावावे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये अति वेगाने वाहन चालवू नये . मद्य प्राशन करून वाहन चालू नये. वाहन परवाना तसेच वाहन आणि वाहन चालकांनी सुरक्षा विमा वेळोवेळी नूतरीकरण करावा. रस्ता सुरक्षा उपाययोजनांची माहिती करून घ्यावी त्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देखील न्यायमूर्ती सप्रे यांनी दिल्या आहेत.

सुरक्षेसाठी हेल्मेट

दुचाकी वाहन चालकांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहन चालकांनी स्वतः आणि सोबत असलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणारे हेल्मेट चा वापर करावा. त्यासाठी प्रशासनानं दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती करावी. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे. अशा सूचना देखील न्यायमूर्ती सप्रे यांनी दिल्या आहेत.

यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण आदी उपस्थित होते.