Hero ने लॉंच केली Hero Optima CX 5.0 ; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मित्रांनो तुम्हाला जर नवनवीन गाड्या खरेदी करण्याची क्रेझ असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण भारतातील विश्वसनीय हिरो कंपनीने एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. तर आम्ही ज्या गाडीबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे Hero Optima CX 5.0. चला पाहूया या नव्या गाडीची वैशिष्ट्य आणि किंमत

129 km रेंज

तर आता जर आपण Hero च्या Optima CX 5.0 स्कूटर मधील उपलब्ध फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर Optima CX 5.0 अतिशय मजबूत आणि उत्कृष्ट फीचर्ससह सज्ज आहे. उदाहरणार्थ, या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर यांसारखी सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

4.38 इंच एलईडी स्क्रीन सह ही बाईक उपलब्ध आहे. ज्यामध्ये बाईकची स्पीड मायलेज असे सगळे फीचर्स दिसू शकतात. शिवाय या गाडीमध्ये तुम्हाला तुमचा फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पोर्ट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या गाडीचे वजन 99 किलोग्रॅम इतके आहे

बॅटरी

या गाडीच्या बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर ३.३ किलोमीटर ची बॅटरी या स्कूटर मध्ये तुम्हाला मिळेल. एकदा सिंगल चार्ज केल्यानंतर ही गाडी 129 किलोमीटर पर्यंत चालवली जाऊ शकते. आणि शंभर टक्के चार्ज होण्यासाठी ही गाडी जवळपास दोन तास 45 मिनिटांचा वेळ घेते.

किंमत

आता या गाडीच्या किमती बद्दल सांगायचं झालं तर एक लाख चार हजारांच्या आसपास या गाडीची किंमत आहे. मात्र जर तुम्ही बँक ऑफर्स सह ही गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला पाच ते दहा हजार रुपयांचा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल.