Hero Xoom125 Launched : Hero ची नवीन Xoom 125 स्कूटर लाँच ; जाणून घ्या फीचर्स अन किंमत

0
1
Hero Xoom125 Launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero Xoom125 Launched – हीरो मोटोकॉर्पने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये आपली नवीन स्कूटर Xoom 125 विक्रीसाठी लाँच केली आहे. कंपनीने हि स्कूटर दोन वेरिएंट्समध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये VX आणि ZX समाविष्ट आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की हि स्कूटर डेली कम्यूटर म्हणून एक उत्तम पर्याय आहे. नवीन Hero Xoom 125 ची सुरुवातीची किंमत 86,900 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आलेली आहे. तर चला पाहूया हि नवीन स्कूटर कशी आहे.

फिचर्स आणि डिझाईन (Hero Xoom125 Launched)

Hero Xoom 125 ला कंपनीने स्पोर्टी आणि आक्रमक डिझाईन दिले आहे. स्कूटरचे समोरील एप्रन, इंटिग्रेटेड LED लाइट्स, साइड पॅनेल आणि मागील भाग देखील स्पोर्टी डिझाइनमध्ये आहेत. स्कूटर फिचर्सच्या बाबतीत भरपूर आहे. यामध्ये स्क्रोल-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह ऑल-LED लाइट्स दिल्या आहेत. याशिवाय, इन्स्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे, ज्यामध्ये मायलेज, फ्यूल टाकी रिकामी होण्याची अंतर, स्पीडोमीटर, फ्यूल गेज आणि टेल लाइट्स यासारखी माहिती मिळते. दोन्ही वेरिएंट्समध्ये रंग वगळता इतर काही फरक नाहीत. VX वेरिएंट दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – मॅट स्टॉर्म ग्रे आणि मेटॅलिक टर्बो ब्लू. तर टॉप ZX वेरिएंटमध्ये दोन अतिरिक्त रंग पर्याय दिले आहेत , त्यात मॅट नियॉन लाइम आणि इन्फर्नो रेड.

पॉवर आणि परफॉर्मन्स –

Hero Xoom 125 (Hero Xoom125 Launched) मध्ये 124.6 सीसी क्षमतेचा सिंगल सिलेंडर, एयर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 9.8PS पॉवर आणि 10.4Nm टॉर्क निर्माण करते . इंजिन कंटीन्युअस वेरिएबल ट्रान्समिशन (CVT) गिअरबॉक्ससोबत जोडला गेला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा इंजिन स्मूथ आणि चांगले मायलेज देते. हार्डवेअर बाबत सांगायचं तर, समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. टॉप ZX वेरिएंटमध्ये समोर पॅटेल डिस्क ब्रेक आहे, तर बेस VX वेरिएंटमध्ये रेग्युलर डिस्क ब्रेक आहे.

किंमत –

नवीन Hero Xoom 125 (Hero Xoom125 Launched) ची सुरुवातीची किंमत 86,900 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आलेली आहे. बाजारात Hero Xoom 125 चा सामना Honda Activa 125 सारख्या स्कूटर्ससोबत होणार आहे.

हे पण वाचा : 20 रुपयांचा रिचार्ज, 30दिवस व्हॅलिडिटी; TRAI चं ग्राहकांना गिफ्ट

बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार