उन्हाळ्याच्या तीव्र उन्हापासून सुटका हवी असेल, तर हिल स्टेशनला भेट देण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. मात्र, हिल स्टेशन म्हटले की शिमला, मनाली किंवा नैनिताल यांचाच विचार केला जातो. हे ठिकाणे नक्कीच सुंदर आहेत, पण आता ते खूपच लोकप्रिय आणि गर्दीने भरलेले आहेत. जर तुम्हाला यंदा उन्हाळी सुट्टीत कमी गर्दीची, शांत आणि निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाणे पाहायची असतील, तर खालील हिल स्टेशन नक्कीच आवडतील.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल)
दार्जिलिंग हे भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन्सपैकी एक आहे. एप्रिल-मे महिन्यात येथे हवामान आल्हाददायक असते. येथे विस्तीर्ण चहा बागा, टायगर हिल, रॉक गार्डन, हैप्पी व्हॅली टी एस्टेट आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही ठिकाणे आवर्जून पहावीत.
ऊटी (तामिळनाडू)
ऊटी म्हणजे निसर्गाचा नयनरम्य नजारा! उन्हाळ्यात येथे आल्यानंतर थंडगार हवामानाचा अनुभव घेता येतो. कॉफी व चहा बागांचे सौंदर्य, दाट जंगलं आणि ढगांनी वेढलेले डोंगर आपल्याला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.
लेह-लडाख
रोमांचक प्रवास आणि साहसी अनुभव हवा असेल, तर लेह-लडाख सर्वोत्तम पर्याय आहे. हे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे शांत तिबेटी मठ, नितळ निळ्या रंगाच्या सरोवरांचा मनोहारी देखावा आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळते.
काश्मीर
काश्मीर हे निसर्गप्रेमींसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. श्रीनगर, गुलमर्ग आणि सोनमर्गसारखी ठिकाणे पाहिल्यावर तुम्हाला या जागेचं अप्रूप वाटल्याशिवाय राहणार नाही. उन्हाळ्यात येथे आल्यानंतर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होते.
यंदा उन्हाळी सुट्टीला गर्दीच्या ठिकाणी न जाता, या निसर्गरम्य आणि कमी गर्दीच्या हिल स्टेशनना भेट द्या आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या