Historical Forts : कोकणातील ‘हे’ ऐतिहासिक किल्ले आहेत पर्यटकांचे विशेष आकर्षण; तुम्ही गेलाय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Historical Forts) आपल्या महाराष्ट्रात भव्य इतिहासाचे अनेक पुरावे आहेत. डोंगर- दऱ्या, समुद्रकिनारे, गड- किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. असा भव्य इतिहास आपल्या राज्याला लाभला आहे याहून मोठे भाग्य ते काय! महाराष्ट्रात प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अनेक पर्यटक येत असतात. येथील प्रत्येक वास्तू आणि ठिकाणे एक्स्प्लोअर करत असतात. मात्र या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते ते येथील गड- किल्ले.

महाराष्ट्राला अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणांसह विलोभनीय समुद्रकिनारे आणि सोबतच समृद्ध करणारा इतिहास लाभला आहे. अशा या ऐतिहासिक किल्ल्यांविषयी अनेक पर्यटकांना कायम कुतूहल राहीलं आहे. त्यामुळे हे किल्ले पाहण्यासाठी कायम लोकांची गर्दी असते. कोकणातील समुद्रकिनारे पाहता पाहता अनेक पर्यटक कोकणातील ऐतिहासिक किल्ले (Historical Forts) पाहण्यासाठी येत असतात.

एकीकडे निळाशार समुद्र, पांढरी वाळू, उंच नारळाची झाडे, लाल माती, काजू – आंब्याच्या बागा आणि विशेष खाद्य संस्कृतीसाठी ओळखला जाणारा कोकण ऐतिहासिक गडकिल्ल्यांमुळे आणखी विशेष ठरतो. (Historical Forts) कोकणातील काही गडकिल्ल्यांविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. जे पाहण्यासाठी आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात. जर तुम्हाला या किल्ल्यांविषयी माहित असेल तर उत्तम. पण माहित नसेल तर किमान एकदा तरी या किल्ल्यांना जरूर भेट द्या.

जयगड किल्ला (Historical Forts)

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘जयगड किल्ला’ हा ‘विजय किल्ला’ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर जयगड किल्ला स्थित आहे. हा किल्ला किनारी भागात सुमारे १३ एकर क्षेत्रात पसरलेला आहे. या किल्ल्याचे बांधकाम ६ व्या शतकातील असल्याने पर्यटकांसाठी तो प्रमुख आकर्षण आहे. (Historical Forts) या किल्ल्यावरील लाईटहाऊस अगदी पाहण्याजोगे आहे. शिवाय येथून अथांग समुद्रकिनाऱ्याचे दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते. त्यामुळे कोकणातील या किल्ल्याला एकदा तरी अवश्य भेट द्या.

कुलाबा किल्ला

अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेला कुलाबा किल्ला देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. किनाऱ्यापासून अगदी २ किलोमीटर अंतरावर वसलेला हा किल्ला चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. मुख्य असे की, हा किल्ला ३०० वर्षे जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचे बांधकाम केले होते.

(Historical Forts) हा किल्ला समुद्री असला तरीही इथे जायला बोटीची गरज लागत नाही. समुद्रकिनाऱ्यापासून अगदी चालत या किल्ल्यावर सहज जाता येते. निसर्गावर अतोनात प्रेम करणाऱ्यांसाठी हा किल्ला एक्स्प्लोअर करणे फारच आनंददायी ठरेल. शिवाय इतिहासात रुची असेल तर आणखी उत्तम. या किल्ल्याचे काही अवशेष आणि बुरूज सध्या शिल्लक आहेत. त्यामुळे एकदा तरी या किल्ल्यावर जरूर जा.