Holi 2024: यंदाची होळी बनवा अविस्मरणीय ; भेट द्या ‘या’ ठिकाणांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Holi 2024: होळी हा रंगांचा उत्सव आहे. संपूर्ण देशभरात होळी धुमधडाक्यात साजरी केली जाते. पण त्यातही भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथली होळी (Holi 2024) ही विशेष असते. आजच्या लेखात अशाच काही ठिकांणाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिथली होळी म्हणजे केवळ एक अविस्मरणीय अनुभव असेल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकांणाबद्दल…

मथुरा आणि वृंदावन (Holi 2024)

मथुरा वृंदावन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान. उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावनची होळी ही प्रसिद्ध आहे. अगदी जगभरातून या ठिकाणी होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक येत असतात. होळीच्या दिवसांमध्ये इथं मुक्तपणे रंगांची उधळण केली जाते. लोकगीत गायले जातात आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. लोक राधा कृष्णाचे देखावे देखील सादर करतात आणि कृष्णाला रंग लावतात ,कृष्णाची पूजा इथं मोठ्या धुमधडाक्यात केले जाते. या दिवशी मंदिरांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.

बरसाणा आणि नांदगाव

बरसाना इथली होळी ही विशेष आहे कारण इथं केवळ रंग (Holi 2024) खेळले जात नाहीत. तर इथे स्त्रिया गोल रिंगण करून मध्ये पुरुषांना ठेवून काठीने त्यांना मारतात. आणि पुरुष आपल्याला काठी लागायला नको म्हणून ढाल बनवून स्वतःचं रक्षण करत असतात. असा हा पारंपारिक खेळ बरसाना इथं होळीच्या दिवशी खेळला जातो. अनेक वर्षांपासून ही परंपरा इथे चालत आलेली आहे. या प्रथेला कृष्णा आणि राधा यांच्या पौराणिक कथांचा संदर्भ जोडला जातो.

जयपूर

भारतातलं गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपुर मध्ये देखील होळी हा सण धूमधडाक्यात आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. सिटी पॅलेस मध्ये अगदी शाही पद्धतीने होळी (Holi 2024) साजरी केली जाते. यामध्ये पारंपारिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा सहभाग होळी दिवशी केला जातो. तर राजेशाही होळी तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही जयपूरच्या होळीचा आनंद घेऊ शकता. राजस्थानमध्ये होलीका दहनाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

दिल्ली (Holi 2024)

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये होळी हा सण अतिशय उत्साहात साजरा केला (Holi 2024) जातो. दिल्लीतली गल्ली गल्ली देखील या दिवशी रंगाने उजळून गेलेली असते. शिवाय लाल किल्ला, कुतुबमिनार, जंतरमंतर आणि लोटस टेंपल अशा ठिकाणांना सुद्धा तुम्ही भेटी देऊ शकता.