Holi Special Trains : भारतीय सणांमध्ये होळी या सणाला मोठे महत्व आहे. होळीचा निमित्ताने अनेक चाकरमानी आपल्या गावी जातात. त्यासाठी ट्रेन्सचे बुकिंग आधीपासूनच केले जाते. तुम्ही देखील ट्रेनने होळीसाठी गावी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. होळीसाठी रेल्वे विभागाकडून तब्बल 112 ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्स कधीपासून आणि कोणत्या वेळेत धावतील ? कोणत्या मार्गावरून या ट्रेन जातील ? चला जाणून घेऊया…
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – बनारस साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)
01053 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01054 विशेष दि. १४.०३.२०२४, दि.२१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे).
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेऱ्या) (Holi Special Trains)
01409 विशेष दि.२३.०३.२०२४, दि. २५.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01410 विशेष दि. २४.०३.२०२४, दि.२६.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मैहर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि आरा.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे).
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – समस्तीपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4 फेऱ्या) (Holi Special Trains)
01043 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01044 विशेष दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे ).
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – प्रयागराज साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष (८ फेऱ्या)
01045 विशेष दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४, दि. २६.०३.२०२४ आणि दि. ०२.०४.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि प्रयागराज येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01046 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४, दि. २७.०३.२०२४ आणि दि. ०३.०४.२०२४ रोजी प्रयागराज (Holi Special Trains) येथून १८.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)