Home Loan EMI : गृहकर्जाचे हफ्ते चुकले तर..? पहा काय सांगतो RBI चा ‘हा’ नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan EMI) आजच्या स्पर्धात्मक युगात जो तो आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धावतो आहे. हक्काचं घर हे त्यापैकीच एक स्वप्न. जे पूर्ण करण्यासाठी सर्व सामान्यांची मोठी धडपड होताना दिसते. आजच्या काळात घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. त्यामुळे साहजिक आहे की, लोक घर खरेदी करतेवेळी आधी गृहकर्ज घेतात. शिवाय अनेक बँकांनी गृहकर्जाच्या प्रक्रिया अगदी सुलभ आणि सोप्या केल्यामुळे आणखीच सोयीचे झाले आहे. गृहकर्ज ही एकप्रकारे मोठी जबाबदारी असते. त्यामुळे कर्जाचे हफ्ते व्यवस्थित जाणे गरजेचे असते. पण तरीही तुम्हाला हफ्ते भरणे कठीण जात असेल आणि तुमचे हफ्ते चुकत असतील तर RBI नियम याबाबत काय सांगतो? हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

आजचा नोकरदार वर्ग सॅलरीच्या जोरावर सहज गृहकर्ज मिळवून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. मात्र तरीही अनेकदा काही ना काही अडचणींमुळे गृहकर्जाचा EMI (Home Loan EMI) वेळेवर भरता येत नाही. याची बरीच कारणे असू शकतात. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती, एखाद्याची नोकरी जाणे किंवा अजून काहीही कारण EMI चुकण्यासाठी पुरेसे असू शकते. अशा परिस्थितीत बँकेकडून काय कारवाई केले जाते ते जाऊन घेऊया.

गृहकर्जाचा हप्ता चुकला तर…? (Home Loan EMI)

गृहकर्ज ही एकप्रकारे जबाबदारी असते. त्यामुळे गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी भरला जाणारा हफ्ता चुकवून चालत नाही. मात्र गृहकर्जाची परतफेड करता येत नसेल तर याबाबत RBI चे नियम काय सांगतात? याची माहिती कर्जदाराला असायला हवी. समजा, एखाद्या कर्जदाराने गृहकर्जाचा पहिला हप्ता काही कारणास्तव भरला नाही तर बँक वा वित्तीय संस्था त्याचा गांभीर्याने विचार करत नाही. काही कारणास्तव हप्ता भरण्यास विलंब होत असेल असे समजले जाते.

मात्र, जेव्हा ग्राहक सलग २ EMI चुकवतो तेव्हा बँक पहिला रिमाइंडर देते. (Home Loan EMI) त्यानंतरही तिसरा हप्ता चुकला तर मात्र बँक कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवते. म्हणजेच काय तर, ३ हफ्ते चुकवल्यास बँक कारवाई करू शकते. दरम्यान, बॅंकेच्या कायदेशीर नोटीसनंतर कर्जाची परतफेड केली नाही तर कर्जर्स डिफॉल्टर म्हणून घोषित करून त्याचे कर्ज खाते NPA म्हणून जाहीर केले जाते.

काय सांगतो RBI चा नियम?

गृहकर्जासारख्या सुरक्षित कर्जामध्ये काही मालमत्ता गहाण ठेवली जाते. त्यामुळे कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर बँक गहाण ठेवलेली मालमत्ता विकून कर्जाची रक्कम वसूल करते. मात्र हा पर्याय शेवटचा मानला जातो. (Home Loan EMI) RBI च्या नियमानुसार, कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदाराला बऱ्यापैकी वेळ दिला जातो. सामान्यपणे ३ महिने सलग हफ्ते चुकवल्यास बँकेकडून ग्राहकांना आणखी २ महिन्याची मुदत दिली जाते.

मात्र यातही कर्जदाराने परतफेड केली नाही तर मात्र बँक ग्राहकाला मालमत्तेच्या अंदाजे मूल्यासह लिलावाची सूचना पाठवते. लिलावाच्या तारखेआधी सूचना मिळाल्यानंतरदेखील महिन्याभरात ग्राहकाकडून हप्ता भरला गेला नाही तर बँक लिलावाची प्रक्रिया पुढे नेते. (Home Loan EMI) बँकेकडे लिलाव हा पैसे परत मिळवण्यासाठीचा कायदेशीररित्या उपलब्ध असलेला अंतिम पर्याय मानला जातो. यातून मिळणारी कर्जाची रक्कम ऑफसेट करण्यासाठी वापरली जाते.