Home Loan : ‘या’ बँका ग्राहकांना देतायत स्वस्तात गृहकर्ज; लगेच जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan) स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. असंच स्वप्न जर तुम्हीही पाहताय आणि घर घेण्याचा विचार करताय तर त्याआधी हि बातमी जरूर वाचा. कारण घर घ्यायचं म्हणजे गृहकर्ज आणि त्यावरील व्याजदर याविषयीची आवश्यक माहिती असणे गरजेचे असते. सध्या, बजेटनंतर अनेक बँका गृहकर्जावर सवलत देत आहेत आणि याचा फायदा साहजिकच सर्व सामान्यांना होतो आहे. दरम्यान, ग्राहकांना स्वस्तात गृहकर्ज मिळू शकत असल्याने तुम्हाला गृहकर्जावरील व्याजदर जाणून घेणे फायद्याचे ठरणार आहे.

माहितीनुसार, गृहकर्जाचे व्याजदर हे सिबील स्कोअर, पगार, नोकरी आणि नोकरीचा कालावधी अशा महत्वाच्या घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे कोणकोणत्या बँकांमध्ये किती व्याजदराने गृहकर्ज मिळत आहे ते जाणून घेणे आवश्यक ठरते. यानुसार ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. (Home Loan) गृहकर्ज घेताना कोणत्याही समस्येला सामोरे जायला लागू नये म्हणून आज आम्ही तुम्हाला खाजगी आणि सरकारी बँकांच्या व्याजदरांबद्दल आवश्यक ती माहिती देणार आहोत. आपल्या देशातील काही मोठ्या बँकांच्या व्याजदराची माहिती जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

१) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank Of India) (Home Loan)

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बजेटनंतर हि बँक गृहकर्जावर आपल्या ग्राहकांना ८.६० टक्के आणि ९.४५ टक्के दराने व्याज देत आहे. गृहकर्ज देतेवेळी गृहर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कल, कालावधी आणि कर्जदाराच्या क्रेडिट स्कोर लक्षात घेतला जाईल.

२) एचडीएफसी बँक (HDFC – Housing Development Finance Corporation)

एचडीएफसी बँक ही भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. जिच्या संपत्तीच्या हिशोबाने देशातील खाजगी क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसी बँक ओळखली जाते. हि बँक आपल्या ग्राहकांना वार्षिक किमान ८.५० टक्के ते कमाल ९.४० टक्के दराने व्याज देते आहे. हा व्याजदर गृहकर्ज, शिल्लक हस्तांतरण कर्ज, घराचे नूतनीकरण आणि गृह विस्तार कर्ज या घटकांवर लागू आहे.

३) आयसीआयसीआय बँक (ICICI – Industrial Credit and Investment Corporation of India)

आयसीआयसीआय बँक ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. जी आपल्या ग्राहकांना आर्थिक सेवा प्रदान करते. या सेवा वेगवेगळ्या शाखेनुसार भिन्न असू शकतात. दरम्यान, खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक हि आपल्या ग्राहकांना किमान ९ टक्के ते कमाल १०.०५ टक्के इतक्या दराने (Home Loan) गृहकर्ज देत आहे. या कर्जावरील व्याजदर हे कर्जाचा प्रकार, रक्कम, कालावधी आणि कर्जदाराचा क्रेडिट स्कोर अशा अनेक घटकांवर अवलंबून आहे.

४) पीएनबी बँक (PNB – Punjab National Bank)

पंजाब नॅशनल बँक ही भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक आहे. हि बँक भारतातील द्वितीय क्रमांकाची सरकारी मालकीची व्यावसायिक बँक म्हणून ओळखली जाते. जी ग्राहकांना आर्थिक सेवा प्रदान करते. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना वार्षिक ८.४० टक्के आणि १०.६० टक्के दराने गृहकर्ज देते आहे. (Home Loan) गृहकर्जाच्या व्याजदर हा कर्जाची रक्कम, त्यासाठीचा कालावधी, कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर आणि घेतलेल्या गृहकर्जाचा प्रकार अशा सर्व घटकांवरून ठरवण्यात येईल.