Home Loan RBI Data : मागील 2 आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या आकडेवाडीत लक्षणीय वाढ; RBI ने दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Loan RBI Data) आपलं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन अर्थात गृह कर्ज योजना अत्यंत फायदेशीर ठरतात. काही आवश्यक बाबींच्या आधारावर अनेक बँका आपल्या ग्राहकांना गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने मिळणारे गृहकर्ज घेऊन अनेक लोकांनी आजपर्यंत आपल्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रविवारी गृह कर्जाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या क्षेत्रातील कर्जाचे आकडे वेगाने वाढत असल्याचे समजत आहे.

आरबीआयने जाहीर केली गृहकर्जाची आकडेवारी (Home Loan RBI Data)

RBI ने रविवारी गृहकर्जाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर समजले की, देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील कर्जाचे आकडे लक्षणीय स्वरूपात वाढत चालले आहेत. त्यानुसार, गेल्या २ आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या रकमेमध्ये एकूण १० लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समजत आहे. आर्थिक वर्ष मार्च २०२२ मध्ये रियलक इस्टेटची थकबाकी २,९७,२३१ कोटी रुपये होती. पुढे आर्थिक वर्ष मार्च २०२३ मध्ये एकूण थकबाकी वाढून २७.२३ लाख कोटी रुपये इतकी झाली. यानंतर आता मार्च २०२४ मध्ये, व्यावसायिक रिअल इस्टेटची थकबाकी ४,४८,१४५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे समोर आले.

मार्च २०२४ मध्ये घरासाठी थकीत कर्जाचा आकडा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची क्रमवार आकडेवारी पाहिली असता समजते की, आर्थिक वर्ष मार्च २०२२ मध्ये १७,२६,६९७ कोटी रुपये होता. तर मार्च २०२३ मध्ये हा आकड़ा १९,८८,५३२ कोटी रुपये इतका झाला. (Home Loan RBI Data) पुढे मार्च २०२४ मध्ये घरांसाठी थकित कर्जे एकूण २७,२२,७२० कोटी रुपये इतका आकडा समोर आला आहे. तसेच, मार्च २०२४ मध्ये व्यावसायिक स्थावर मालमत्तेसाठी ४,४८,१४५ कोटी रुपयांची थकबाकी कर्जे होती. तर मार्च २०२२ मध्ये हाच आकडा २,९७,२३१ कोटी रुपये इतका होता.

गृहनिर्माण कर्ज वाढ सुरूच राहणार

काही मालमत्ता सल्लागारांनी सादर केलेल्या अहवालानुसार, गेल्या २ आर्थिक वर्षात घरांची विक्री आणि किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याबाबत बँक ऑफ बडोदाच्या मुख्य अर्थतज्ञांनी देखील विशेष माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘निवासी क्षेत्रातील सर्व विभागातील तेजीमुळे गृहकर्जात मोठी वाढ झाली आहे. (Home Loan RBI Data) सरकारच्या प्रयत्नांमुळे विशेषतः परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात तेजी आली आहे. यामुळे येत्या काळात देखील गृहनिर्माण कर्जाची वाढ चांगल्या लक्षणीय स्वरूपात सुरूच राहणार’.