Home Loan : भाड्याचं घर की गृहकर्ज ? कन्फ्युज आहात ? येथे मिळेल उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Loan : सध्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी घर घेणे म्हणजे मोठे जोखमीचे बनले आहे. शिवाय घरांच्या किमती आणि महागाई दोन्ही वाढल्या आहेत. अशा स्थितीत घर घ्यायचं ? की भाड्यानं राहून पैसे साठवायचे असा सवाल तुमच्या मनात (Home Loan) नक्की येऊ शकतो. तर आजच्या लेखात आम्ही तुमचे हे कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेउया…

घर खरेदी करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्यास गृहकर्जाची मदत घेतली जाते. मात्र सध्या अलीकडच्या काही महिन्यांमध्ये गृह कर्जाच्या व्याजदरात देखील मोठी वाढ झाली आहे. असे असताना व्याजदर जास्त असल्यामुळे भाड्यानं (Home Loan) राहणं चांगलं की घर घेऊन राहणं चांगलं ? या बाबतीत स्वतःच्या मतानुसार फायदे आणि तोटे असू शकतात. आता ह्या दोन्ही बाजूंमध्ये काय फायदे आणि काय तोटे आहेत हे जाणून घेऊया आणि मग तुम्ही या दोन्हीपैकी कोणता निर्णय घ्यायचा हे मत ठरवू शकता.

भाडयाने घर घेण्याचे फायदे (Home Loan)

  • भाड्याचे घर घेताना दर महिन्याला पैसे द्यावे लागतात तर नवीन घर घेतल्यावर (Home Loan) लाखो रुपये एक रकमी द्यावे लागतात.
  • भाड्याचं घर कधीही बदलता येत.
  • भाड्याच्या घरामध्ये दुरुस्ती आणि देखभालीसाठी जास्त पैसे देण्याची गरज नसते. मात्र इथे डाऊन पेमेंट द्यावे लागते.
  • तुम्हाला एखाद्या वेळेस एकाच जागी राहून कंटाळा आला असेल तर तुम्ही भाड्याचे घरामध्ये राहत असताना हे घर बदलू शकता. मात्र घर स्वतःच असल्यानंतर तसा चॉईस नसतो.
  • भाड्याचं घर घेतल्यानंतर आर्थिक जबाबदारी कमी होते आणि दरमहा EMI भरण्याचे टेन्शन राहत नाही.
  • भाड्याचं घर घेतल्यानंतर अधिक बचत होते. हे पैसे तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी किंवा बचत (Home Loan) म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा इतर मालमत्तेमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता.

गृह कर्ज घेऊन स्वतःचे घर घेतल्यास फायदे (Home Loan)

  • जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा त्याची एक किंमत ठरलेली असते. कालांतरांना ही किंमत वाढू (Home Loan) लागते त्यामुळे तुम्ही इथे फायद्यात असता.
  • गृह कर्जामुळे आयकर मध्ये सूट मिळते.
  • तुम्ही तुमचे घर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने वापरू शकता. केव्हाही येऊ शकता केव्हाही जाऊ शकता. घर मालकाची कटकट स्वतःच्या घरामध्ये नसते.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं घर तुमचं आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षिततेची भावना देतं.