Home Loan : देशातील ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त व्याजदरात होम लोन; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Loan : घर बघावे बांधून अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. घराची स्वप्न पूर्ण करणे महागले आहे. सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्ज घ्यावे लागते आहे . जर तुम्ही सुद्धा घर बांधण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान आज आपण सर्वात स्वस्त व्याजदरात होम लोन (Home Loan) उपलब्ध करून देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत.

स्वस्तात गृह कर्ज देणाऱ्या बँका (Home Loan)

इंडसइंड बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर ८.४% ते ९.७५% पर्यंत आहेत.

इंडियन बँकेचे होम लोनचे व्याजदर ८.४५% ते ९.१% पर्यंत आहेत.

HDFC बँकेचे होम लोनचे (Home Loan) व्याजदर 8.45% ते 9.85% पर्यंत आहेत.

UCO बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर 8.45% ते 10.3% पर्यंत आहेत.

बँक ऑफ बडोदामधील होम लोनचे (Home Loan) व्याजदर ८.५% ते १०.५% पर्यंत आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रमधील गृहकर्जाचे व्याजदर ८.६% ते १०.३% पर्यंत आहेत.

युनियन बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा व्याजदर ८.७५% ते १०.५% पर्यंत आहे.

IDBI बँक गृह कर्जाचा व्याजदर 8.75% ते 10.75% पर्यंत आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर ८.८% ते ९.४५% पर्यंत आहेत.

कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्जाचे व्याजदर ८.८५% ते ९.३५% पर्यंत आहेत.