Home Loan : घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; ही बँक देत आहे सर्वात स्वस्त लोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Loan : सध्याच्या महागाईच्या काळात स्वात:चे घर घेणे काही सोपें काम राहिले नाही. मात्र आता तुमच्या हक्काचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत जी बँक तुम्हाला कमी व्याज दारात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. होळीच्या निमित्ताने तुम्हाला घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता सरकारी बँकांकडून स्वस्त कर्ज (Home Loan) ऑफरचा लाभ घेऊ शकता.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया (BOI) ने मंगळवारी नवीन गृहकर्जावरील व्याजदर 0.15 टक्क्यांनी 8.45 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. ही मर्यादित कालावधीची योजना या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत लागू राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचे (Home Loan) प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

बँक देणार सर्वात स्वस्त लोन (Home Loan)

बँकेने दावा केला आहे की 8.3 टक्के व्याज दर त्यांच्या इतर बँकांच्या तुलनेत सर्वात कमी (Home Loan) दर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँक यांसारख्या आघाडीच्या बँकांमध्ये किमान दर 8.4 टक्के असल्याचे बँकेने म्हटले आहे. ही ऑफर फक्त ३१ मार्चपर्यंत आहे.

रूफटॉप सोलर प्लांटसाठी सात टक्के व्याजदराने विशेष कर्ज सुविधा उपलब्ध करून देत (Home Loan) असल्याचे बँकेने म्हटले आहे. यामध्ये प्रक्रिया शुल्कही माफ करण्यात आले आहे. बँकेने सांगितले की, व्याजदर कपातीनंतर 30 वर्षांच्या गृहकर्जावरील मासिक हप्ता (EMI) 755 रुपये प्रति महिना असेल.