Home Remedies For Mouth Ulcers : उष्णतेमुळे तोंडात आले फोड? खाणेही झाले मुश्किल; ‘हे’ घरगुती उपाय केल्यास मिळेल त्वरित आराम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies For Mouth Ulcers) उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या गरमीसोबत शरीराचे तापमान आपोआप वाढत जाते. ज्यामुळे आरोग्यविषयक विविध समस्या जाणवतात. यामध्ये अनेकांनी डिहायड्रेशनची समस्या जाणवते. तर काहींना तोंडात फोड येऊन जखमा येतात. ज्यामुळे काहीही खाणे पिणे मुश्किल होते. अगदी थंड पदार्थ खातानाही तोंडातील जखमा झोंबतात. मग गरम काही खाणे सोडाच. अशावेळी तोंडातील फोड घालवण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी प्रभावी उपायांची गरज असते.

सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे जर तुम्हीही अशा त्रासाने वैतागले असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. कारण या बातमीतून आम्ही तुम्हाला तोंडात फोड येण्याची मुख्य करणे आणि या समस्येवर अत्यंत प्रभावी आणि झटपट आराम देणारे घरगुती उपाय सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

तोंडात फोड येण्याचे आणि व्रण होण्याचे कारण

बऱ्याच लोकांना विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात असा त्रास जाणवतो. कारण, या दिवसात शरीराचे तापमान वाढलेले असता. परिणामी ती अशा प्रकारे शरीरातून उत्सर्जित होते. (Home Remedies For Mouth Ulcers) याशिवाय तोंडात असे व्रण होण्यामागे आणखी काही कारणे असू शकतात. जसे की, जास्त मसालेदार अन्न किंवा गरम अन्न खाणे, पोट खराब होणे किंवा बद्धकोष्ठता, सुपारी खाल्ल्यानंतर रात्री तोंड स्वच्छ न करता झोपणे, तंबाखू पान- मसाला आणि धूम्रपान करणे.

घरगुती उपाय (Home Remedies For Mouth Ulcers)

1. तुळशीची पाने – तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. शिवाय इतर औषधी गुणांनी समृद्ध असलेली तुळस तोंडातील फोड आणि जखमा बरे करण्यासाठी प्रभावी ठरते. यातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म तोंडाच्या व्रणांमूळे होणाऱ्या वेदना दूर करून आराम देतात. यासाठी तुळशीची पाने चावून खावी. त्यावर कोमट पाण्याने गुळण्या केल्यास लगेच आराम मिळेल.

2. कोरफड ज्यूस – कोरफड आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांची संपन्न असल्याने कोरफडीचा रस तोंडातील जखमांवर लावल्यास लगेच आराम मिळतो. (Home Remedies For Mouth Ulcers) जळजळ थांबते आणि मुख्य म्हणजे वेदना कमी होतात. त्यामुळे लवकर आराम मिळवण्यासाठी दिवसातून किमान २ वेळा कोरफडीचा रस लावा.

3. मध – जर तुम्हीही उष्णतेमुळे तोंडात फोड येण्याच्या समस्येने हैराण असाल तर प्रभावी घरगुती उपचार म्हणून मधाचा वापर करा. (Home Remedies For Mouth Ulcers) एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून तोंडात लावा. यामुळे लवकर आराम मिळेल.

4. खोबरेल तेल – खोबरेल तेलात बुरशीविरोधी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. शिवाय यातील दाहक विरोधी गुणधर्म तोंडातील जखमांपासून आपली सुटका करू शकतात. त्यामुळे तोंडातील फोड आणि व्रण घालवायचे असतील खोबरेल तेल लावा. यामुळे की=जळजळ आणि वेदनांपासून त्वरित आराम मिळेल. (Home Remedies For Mouth Ulcers)