Home Remedies : केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात मिसळा 2 आयुर्वेदिक पाने; परिणाम पाहून चकित व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केस कुणाला नको असतात? असं म्हणतात खरं सौंदर्य केसात असतं. त्यामुळे केसांची व्यवस्थित निगा राखायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीत जिथे खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे केसांचे आरोग्य राखायला वेळ कुठे मिळणार? त्यामुळे अकाली केस पांढरे होणे, केस विरळ होणे, केसांना फाटे फुटणे आणि अगदी टक्कल पडणे अशा अनेक समस्यांना कितीतरी लोक सामोरे जात आहेत. बिघडत्या जीवनशैलीमुळे केसांचे होणारे हाल दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

तुमच्याही केसांचे असेच हाल होत असतील आणि तुमचे केस विरळ होत असतील तर चिंता करू नका. आज आपण एक अत्यंत जबरदस्त फॉर्म्युला जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमच्या केसांचे गळणे थांबेल आणि केस घनदाट होऊन लांबसडक वाढतील. (Home Remedies) खोबरेल तेल केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते हे आपण जाणतोच. पण खोबरेल २ अत्यंत प्रभावी पाने मिसळल्यास अधिक फायदा होतो. ही पाने कोणती आणि ती कशी मिसळावी याविषयी जाणून घेऊया.

खोबरेल तेलात मिसळा कडीपत्त्याची पाने (Home Remedies)

केसांसाठी खोबरेल तेल थेट न वापरता त्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकून केसांसाठी वापरणे फायदेशीर ठरेल. कडीपत्त्यातील विटामिन सी- बी, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट तुमच्या केसांच्या वाढीसाठी प्रभावीपणे काम करतात. शिवाय तुमच्या केसांना मजबूत बनवण्यासाठी कडीपत्ता फायदेशीर ठरतो आणि अकाली पांढऱ्या पडणाऱ्या केसांवर देखील प्रभावी ठरतो. यासाठी १ वाटी खोबरेल तेलात ४- ५ कडीपत्त्याच्या काड्यांवरील पाने घालून तेलाला उकळी काढून घ्या. (Home Remedies) हे तेल साधारण कोमट किंवा थंड केल्यानंतर केसांना मसाज करा. या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा केल्यास लवकरच परिणाम दिसून येतो.

खोबरेल तेलात मिसळा कडुलिंबाची पाने

खोबरेल तेलासोबत कडुलिंबाच्या पानांचा वापर केल्यास केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी डँड्रफ, अँटी फंगल आणि अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचा स्काल्प स्वच्छ करण्यास मदत होते. शिवाय रक्ताभिसरण देखील व्यवस्थित होते. (Home Remedies) परिणामी केसांच्या वाढीसाठी प्रोत्साहन मिळते. यासाठी १ वाटी खोबरेल तेलात कडुलिंबाचे तेल किंवा कडूलिंबाची पाने घाला. हे तेल कडवून थंड करून घ्या आणि केसांना मालिश करा. या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा केल्यास चांगले परिणाम मिळतात.

खोबरेल तेलच का?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन्ही आयुर्वेदिक पानांसोबत खोबरेल तेलाचाच वापर का केला जातो? तर खोबरेल तेलामध्ये अनेक असे गुणधर्म समाविष्ट असतात जे तुमच्या केसांसाठी आणि स्काल्पसाठी चांगले असते. घनदाट, निरोगी केसांसाठी खोबरेल तेल अत्यंत फायदेशीररित्या काम करते. (Home Remedies) या तेलात अँटिऑक्सिडंट, अँटीबॅक्टरियल आणि फॅटीऍसिड असते. जे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि यामुळे केस मुळापासून मजबूत वाढतात.