Homeopathy Treatment : होमिओपॅथी उपचारांनी मुळापासून बरे होतात मोठ्यातले मोठे आजार; फक्त ‘ही’ काळजी घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Homeopathy Treatment) आज दिनांक १० एप्रिल रोजी ‘होमिओपॅथी दिन’ साजरा केला जात आहे. हा विशेष दिवस पहिल्यांदा १० एप्रिल २००५ रोजी साजरा करण्यात आला होता. हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असा की, लोकांना होमिओपॅथिक औषधांच्या उपचाराबद्दल माहिती प्रदान केली जाईल. विशेष सांगायचे असे की, होमिओपॅथी औषधे अनेक रोगांवर प्रभावी असतात. मात्र त्यांच्याविषयी योग्य आणि पूर्ण माहिती नसल्यामुळे लोक मोठमोठ्या आजारांना बळी पडल्यानंतर खर्चिक आणि मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जातात. जर्मन चिकित्सक विद्वान सॅम्युअल हॅनेमन यांना होमिओपॅथीचे संस्थापक वा जनक मानले जाते. चला तर होमिओपॅथी उपचारांविषयी अत्यंत महत्वाची माहिती घेऊया.

होमिओपॅथी उपचार पद्धती (Homeopathy Treatment)

होमिओपॅथी एक अशी उपचार पद्धती आहे ज्यामध्ये कोणत्याही वेदनांशिवाय आरोग्य विषयक समस्या दूर केल्या जातात. तुमचा आजार कोणताही आणि कितीही दीर्घकालीन असो, तो मुळापासून संपवायचा असेल तर होमिओपॅथीचा अवलंब करणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे विविध उपचार पद्धतींमध्ये होमिओपॅथी उपचार हे अत्यंत प्रभावी मानले जातात. होमिओपॅथी उपचार कोणकोणत्या रोगांवर कशा पद्धतीने काम करतात? जाणून घेऊया

श्वसन मार्गाशी संबंधित समस्या

दगदगीच्या जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याकडे कुठेतरी लक्ष द्यायला कमी पडतो. तसेच आसपासचे वायू प्रदूषण ज्या पद्धतीने वाढत आहे त्याचा परिणाम थेट आपल्या फुफ्फुसांवर होत असतो. (Homeopathy Treatment) यामुळे श्वसन मार्गात विविध प्रकारे अडचणी निर्माण होतात. कळत नकळत आपल्या श्वसन मार्गात अडथळा येऊ लागतो. अशावेळी निष्काळजीपणा केल्यास समस्या गंभीर होऊ शकते. यावेळी होमिओपॅथीच्या मदतीने तुम्ही श्वसन मार्ग मोकळा करू शकता. तसेच फुफ्फुसांचे वायू प्रदूषणापासून संरक्षण करू शकता.

त्वचेसंबंधित समस्या

जर तुम्ही त्वचेसंबंधित कोणत्याही आजाराने त्रस्त असाल आणि हा आजार दीर्घकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर होमिओपॅथी उपचार करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. दाद, खाज, सोरायसिस, बुरशीजन्य संसर्ग, पित्त इत्यादींसाठी होमिओपॅथी औषधे फार प्रभावी ठरतात. इतकेच नव्हे तर मुरूम आणि चेहऱ्यावर येणारे डाग यासाठी देखील होमिओपॅथी उपचार प्रभावीपणे काम करतात. (Homeopathy Treatment)

पोटाशी संबंधित समस्या

आजकालची जीवनशैली आणि त्यात खाल्ले जाणारे अन्नपदार्थ हे शरीरासाठी चांगले असतीलच याची काही खात्री नाही. त्यामुळे अनेकदा ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि आतड्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. (Homeopathy Treatment) होमिओपॅथीचे उपचार घेतल्याने अशा आजारांवर मात करता येते. यामुळे दुर्लक्ष करण्याऐवजी वेळीच अशा समस्यांवर लक्ष देऊन होमिओपॅथी उपचार करणे फायदेशीर ठरते.

किडनीशी संबंधित समस्या

शरीरासाठी आणि पोटासाठी हानिकारक असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने किडनी संबंधित समस्या होण्याची शक्यता वाढते. खास करून शुगर आणि बीपीच्या रुग्णांमध्ये किडनी इन्फेक्शन, युरीन इन्फेक्शन सारख्या निर्माण होतात. अशा गंभीर स्वरूपातील समस्यांवर होमिओपॅथी औषधांच्या मदतीने उपचार करता येतात. काही काळ सलग होमिओपॅथी उपचार (Homeopathy Treatment) घेतल्यास या समस्या देखील दूर होतात.

सांधेदुखी आणि सूज

होमिओपॅथी उपचारांमध्ये सांधेदुखीवर अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. अनेकदा वजनाची कामे केल्याने किंवा शरीराचे वजन वाढल्याने सांध्यांवर ताण येतो आणि त्यामुळे सांधेदुखी, सांध्यांमध्ये वेदना होतात. (Homeopathy Treatment) काही वेळा सांध्यांना सूजदेखील येते. अशा वेदना सौम्य असो किंवा तीव्र यावर होमिओपॅथी औषधांनी उपचार केल्यास आराम मिळतो आणि सांधेदुखी पासून सुटका देखील होते.

होमिओपॅथी उपचार घेताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

  1. होमिओपॅथी उपचार करून विविध रोगांशी किंवा आरोग्यविषयक समस्यांशी दोन हात करणे सोपे जाते. तसेच लवकरात लवकर आराम मिळतो. मात्र, कोणत्याही आजारावर उपचार घेण्याआधी तुम्हाला त्या आजाराशी संबंधित संपूर्ण तपशील डॉक्टरांना देणे गरजेचे आहे.
  2. तसेच तुम्ही कोणती औषधे घेता, कोणत्या चाचण्या केल्या आहेत किंवा नियमित स्वरूपात करत आहात त्याचे परिणाम काय आले? हे होमिओपॅथी औषधे देणाऱ्या डॉक्टरांना सांगणे महत्त्वाचे असते. यावरून तुमच्या शरीरासाठी कोणती औषधे किती प्रमाणात देणे गरजेचे आहे? हे ठरवले जाते. (Homeopathy Treatment)
  3. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जर तुम्ही होमिओपॅथी औषधोपचार घेत असाल तर जेवण आणि औषधे यांमध्ये किमान १५ ते २० मिनिटांचे आंतर असणे गरजेचे आहे.
  4. तसेच होमिओपॅथी औषधे घेण्याच्या १ ते २ तास आधी लसूण किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचे सेवन करू नये.
  5. लक्षात घ्या, होमिओपॅथी औषधांचा प्रभाव चांगला असला तरीही समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. आज उपचार घेतले आणि उद्या आजार बरा झाला असे कोणत्याही औषधांबाबत घडत नाही. (Homeopathy Treatment)