हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध जपानी ऑटोमोबाईल कंपनी होंडा लवकरच आपल्या होंडा एलेव्हेट एसयूव्ही चा ब्लॅक एडिशन (Honda Elevate Black Edition) भारतीय बाजारात सादर करू शकते, अशी चर्चा सगळीकडे होत आहे. भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन होंडा हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे हि बातमी होंडा प्रेमींसाठी महत्वाची ठरणार आहे. तर चला होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन गाडीची सर्व माहिती या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशनची वैशिष्ट्ये –
ब्लॅक एडिशनमध्ये गाडीचा बाहेरचा रंग पूर्णपणे काळा ठेवण्यात आला आहे. तसेच, अलॉय व्हील्स, पेंट स्कीम, आणि बाहेरील डिझाईनमध्ये ब्लॅक थीमचा समावेश आहे. गाडीच्या मागील बाजूस लिफ्टच्या खाली एक नवीन बॅजही दिसतो. तसेच डिझाईनमध्ये इतर कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. गाडीच्या इंजिन बदल सांगायचं झालं तर , इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. होंडा एलिव्हेटमध्ये आधीपासून उपलब्ध असलेले 1.5 लिटर इंजिनच वापरले जाणार आहे, जे 121 पीएसची पॉवर आणि 145 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीमध्ये मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय देखील उपलब्ध असतील .
लाँच आणि किंमत –
होंडा (Honda) एलिव्हेट ब्लॅक एडिशन कधी लाँच (launch) होईल याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण ही गाडी 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 कार्यक्रमात सादर केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नियमित होंडा एलिव्हेटची किंमत 11.69 लाख ते 16.43 लाख रुपये आहे. पण या नवीन ब्लॅक एडिशनमुळे किंमतीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. हि गाडी लाँच झाल्यास, तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशन आणि एमजी हेक्टर ब्लॅक एडिशन सारख्या गाड्यांशी होईल.