हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda New Activa Launched – होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने त्यांची बेस्ट-सेलिंग स्कूटर Honda Activa110 लाँच केली आहे. हि गाडी आधी लाँच केलेल्या माँडेलपेक्षा जास्त फीचर्सनी परिपूर्ण आहे. तसेच या नव्या गाडीची किंमत 2266 रुपये जास्त आहे. हि गाडी ग्राहकांना सहा रंगात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार रंग निवडण्याची मुभा मिळणार आहे. तर चला जाणून घेऊयात होंडाने लाँच केलेल्या गाडीबद्दल संपूर्ण माहिती.
नवीन फीचर्स (Honda New Activa Launched) –
नवीन स्कूटरमध्ये (Honda New Activa Launched) लुक आणि डिझाइनमध्ये मोठे बदल नाहीत. हे मोठ्या प्रमाणावर मागील मॉडेलसारखेच आहे. Activa मध्ये कंपनीने 109 सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर इंजन दिले आहे, जे 7.8 हॉर्सपॉवर पॉवर आणि 9.05 Nm टॉर्क जनरेट करते . कंपनीचे म्हणणे आहे की, या स्कूटरमध्ये मायलेज वाढवण्यासाठी आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील समाविष्ट केले आहे. तसेच नवीन Honda Activa मध्ये काही नवीन फीचर्स दिली आहेत, ज्यामध्ये 4.2 इंचाचा IFT डिस्प्ले आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. यामुळे राइडरला नेव्हिगेशन, कॉल नोटिफिकेशन सारख्या सुविधा वापरण्याचा पर्याय मिळतो. याचसोबत या स्कूटरमध्ये USB टाइप-C चार्जर देखील दिला आहे.
किंमत आणि रंग –
नवीन Honda Activa 110 (Honda New Activa Launched) कंपनीने तीन वेरिएंट्समध्ये स्टॅण्डर्ड, डिलक्स आणि टॉप मॉडेल एव्ही-स्मार्टमध्ये सादर केली आहे . या स्कूटरची सुरुवातीची किंमत 80,950 रुपये (एक्स-शोरूम) आहे. 2020 च्या सुरूवातीला कंपनीने सध्याच्या जनरेशनचे मॉडेल Activa 6G लाँच केले होते आणि त्यानंतर ते अपडेट केले जात नव्हते. मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन स्कूटर 2266 रुपये महाग आहे. मागील मॉडेलची किंमत 78,684 रुपये होती. तसेच हि गाडी ग्राहकांसाठी 6 रंगात उपलब्ध करून दिली आहे . ज्यात पर्ल साइरन ब्लू, पर्ल प्रेशियस व्हाइट, पर्ल इग्नियस ब्लॅक, डिसेंट ब्लू मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे, आणि रेबेल रेड मेटॅलिक चा समावेश आहे .
हे पण वाचा : आजपासून ST प्रवास महागला!! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज