Hotel Live Streamed : केवळ एक अट आणि 83 रुपयांत करा हॉटेल बुक ; हॉटेलचं अतरंगी बिझनेस मॉडेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Hotel Live Streamed : कुठेही फिरायला जाताना हॉटेल पाहत असताना कमी बजेटमध्ये चांगल्या सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. सध्या तुम्ही ऑनलाईन वेबसाइट वरूनही हॉटेल पाहून रूम बुक करू शकता. केवळ नाममात्र पैसे आणि चांगली रूमसर्व्हिस असलेली अनेक हॉटेल्स पाहायला मिळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अतरंगी हॉटेल बद्दल सांगणार आहोत. ज्या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे फक्त 83 रुपये आहे. मात्र या किफायतशीर हॉटेल मध्ये तुम्हाला राहायचे असेल तर एक अट आहे . ती अट काय आहे. नक्की हे हॉटेल (Hotel Live Streamed ) कुठे आहे चला जाणून घ्या …

दिवसाला केवळ 83 रुपये भाडे असलेले हे हॉटेल जपानच्या फुकोका (Hotel Live Streamed ) येथे आहे. या हॉटेलचे भाडे १०० येन म्हणजेच १ डॉलर म्हणजेच भारतीय चालनानुसार केवळ 83 रुपये आहे. आता तुमच्या मनात सहज प्रश्न पडला असेल की एवढे कमी भाडे या हॉटेलला कसे परवडत असेल ? तर या हॉटेलच्या मालकाने भाडे तर स्वस्त ठेवले आहे मात्र या हॉटेलची एक अट आहे. ही अट मान्य करणाऱ्यांनाच या हॉटेलमध्ये कमी भाड्यात राहायला मिळणार आहे. ही अट देखील हॉटलेप्रमाणे अतरंगी आहे. ही अट ऐकून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

काय आहे अट ? (Hotel Live Streamed )

ग्राहक 83 रुपये भाडे देऊन किती हवे तेवढे दिवस या हॉटेलमध्ये राहू शकतो. मात्र पण इथे राहत असताना त्याने चेक इन करण्यापासून चेक आऊट करण्यापर्यंतचं वास्तव्य लाइव्ह करायचं आहे. म्हणजे ग्राहकाला त्याचा संपूर्ण स्टे लाइव्ह स्ट्रीम (Hotel Live Streamed ) करायचा आहे. टीव्ही वरील ‘बिगबॉस’ शो प्रमाणे तुमच्यावर अनेक कॅमेरे वॉच ठेवणार आहेत. ज्याला ही अट मंजूर असेल त्यांना ही रूम फक्त 83 रुपयांत मिळणार आहे. विशेष म्हणजे अनेक जण ही अट मान्य करून या हॉटेलमध्ये राहतात सुद्धा. केवळ बाथरूम सोडून पूर्ण रुम मध्ये कॅमेरे लावलेले आहेत.

कमाईचे बिझनेस मॉडेल

अनेक हॉटेलस आपला व्यवसाय चालावा म्हणून विविध फंडे वापरात असतात त्याच प्रकारे या हॉटेलने हा फंडा वापरला असून तो लोकप्रियही झाला आहे. रुममध्ये काय चाललंय हे बाहेरच्या लोकांना स्पष्टपणे पाहता येत आहे. जे लोक या हॉटेलची लाइव्ह स्ट्रीम (Hotel Live Streamed )पाहत आहे, त्यांच्याकडून हॉटेल पैसे घेते. यातून हॉटेलची किती कमाई होते हे स्पष्ट झालेलं नाही. पण असाही रयोकन नावाचं हे हॉटेल अनेक वर्षांपासून याच सिद्धांतावर काम करत आहे. हे हॉटेल अल्ट्रा चीप आहे. तसेच लाइव्ह स्ट्रीम हे त्यांनी कमाईचं बिझनेस मॉडेल बनवलं आहे.

येथे राहण्याचे नियम (Hotel Live Streamed )

  • व्यक्तीला केवळ लाइव्ह स्ट्रिमिंगची परवानगी द्यावी लागते.
  • बाथरूम वेगळा आहे, त्यामुळे तिथपर्यंत कॅमेरा पोहोचतच नाही.
  • लाइट्स बंद करण्याची परवानगी असते
  • ही लाइव्ह स्ट्रिमिंग केवळ व्हिडीओची (Hotel Live Streamed ) असते. ऑडिओ नसतो.