तुम्ही कधी ना कधी तरी ट्रेन मधून प्रवास केला असेलच आणि कधी ना कधी तुमचा सामना TTE सोबत झाला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेमध्ये TTE कसे व्हायचे? टीटीई होण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी तुम्हाला कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल? चला जाणून घेऊया…
प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेमध्ये TTE तैनात आहे. जो सर्व प्रवाशांची तिकिटे तपासतो आणि त्यांना त्यांचे नेमके ठिकाण सांगतो. जर एखाद्या प्रवाशाकडे योग्य प्रवासाचे तिकीट नसेल तर TTE त्याला दंड करू शकतो.
काय आहे आवश्यक पात्रता ?
- TTE होण्यासाठी उमेदवाराने 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- रेल्वे टीटीई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डिप्लोमा कोर्स करणे आवश्यक आहे.
- टीटी होण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- उमेदवार कोणत्याही राज्यातून रेल्वे TTE साठी अर्ज करू शकतात.
कोणत्या विषयाचे प्रश्न विचारले जातात?
भारतीय रेल्वे दरवर्षी TT साठी फॉर्म जारी करते. टीटीई परीक्षेत विशेषत: सामान्य ज्ञान, गणित आणि तर्क या विषयांवर प्रश्न विचारले जातात. टीटीई परीक्षेत 150 प्रश्न विचारले जातात. रेल्वेमध्ये टीटीई होण्यासाठी, 150 गुणांची ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला प्रथम विशिष्ट ट्रेन आणि स्टेशनवर प्रशिक्षण दिले जाते. यानंतर त्यांचा कार्यकाळ सुरू होतो
फिजिकल फिटनेस
- उमेदवारांनी RRB ने सेट केलेले सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- दृष्टी क्षमता – अंतर दृष्टी – 6 / 9, 6 / 12 चष्म्यासह आणि शिवाय.
- दृष्टी जवळ – 0.6, 0.6 चष्म्यासह आणि शिवाय
किती मिळतो पगार ?
सहाव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी कमी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली असली, तरी सातव्या वेतन आयोगानुसार पे बँड पद्धत आता संपुष्टात आली असून, उमेदवारांना यापेक्षाही जास्त वेतन मिळणार आहे.
रु 5200/- – रु 20200/- + रु 1900/- ग्रेड पे + DA + HRA + इतर भत्ते
एकूण अंदाजे रु 14,000/- दरमहा