Howrah Mumbai Mail Accident : भारतामध्ये एकापाठोपाठ एक रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. हावडा वरून मुंबईला येणाऱ्या गाडी क्रमांक 12810 हावडा- मुंबई मेल चे १८ डबे बडा बंबू रेल्वे स्थानकाजवळ घसरले. या भीषण अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर (Howrah Mumbai Mail Accident) आहे.
पहाटे 3:43 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला याच ठिकाणी एक मालगाडी देखील रुळावरून घसरली होती. मेल्चे इंजिन मालगाडीला धडकल्यामुळे मेलचे डबे घसरले. जमशेदपूर पासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर अपघाताचे ठिकाण आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात (Howrah Mumbai Mail Accident) आली आहे.
तर अपघात टळला असता (Howrah Mumbai Mail Accident)
हावडाच्या दिशेने जाणारा रुळावर एक मालगाडी घसरली होती. तिला मेलचे डबे धडकले हा अपघात घडला त्यावेळी या मेलचा वेग ताशी 120 किलोमीटर होता. गाडी वेगानं असल्यामुळं जवळपास एक किलोमीटर अंतरावरील रूळ उखडून गेले. याबाबत लोको (Howrah Mumbai Mail Accident) पायलटण नियंत्रण कक्षाला सूचना दिली. त्यानंतर 3.45 वाजताच्या सुमारास वेगाने धावणारी मेल मालगाडीला धडकली. या सहा मिनिटांमध्ये पावलं उचलण्यात आली असती तर हा अपघात टळला असता.