Hruta Durgule : हृता दुर्गुळे पाहतेय ‘नवरोबा’ची वाट; आगामी ‘कन्नी’ सिनेमातील रॅप साँग रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hruta Durgule) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला ‘कन्नी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग आहे. ज्याचे ‘नवरोबा’ असे बोल आहेत. या गाण्यात हृता दुर्गुळे तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसतेय.

पुन्हा पुन्हा ऐकावे वाटेल अशा या गाण्याला ज्योती भांडे आणि सीज़र यांनी आपल्या सुमधुर आवाजात हे गाणे गायले आहे. तर चैतन्य कुलकर्णी यांचे कमाल बोल या गाण्याला लाभले आहेत. (Hruta Durgule) एग्नेल रोमन यांनी गाण्याचे जबरदस्त संगीत दिले आहे आणि या कमाल गाण्यात हृता दुर्गुळेसोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज व ऋषी मनोहरही झळकले आहेत. या गाण्यात मित्रांमध्ये असतानाही हृताची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या ‘नवरोबा’च्या शोधात असल्याचे दिसत आहे.

NAVROBA RAP | Kanni | Marathi Video Song |  Hruta Durgule, Shubhankar Tawde | Jyoti Bhande | Ceesur

अगदी मनापासून आणि फार आतुरतेने ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याची वाट पाहात आहे. यावेळी तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलात ती ‘नवरोबा’ शोधते असे या गाण्यात दिसते. हृताचा हा ‘नवरोबा’ शोध संपणार का? याचे उत्तर प्रेक्षकांना येत्या ८ मार्चला थिएटरमध्ये मिळणार आहे. (Hruta Durgule) मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत.

(Hruta Durgule)या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ‘हा मैत्री, प्रेम, स्वप्ने यांभोवती फिरणारा चित्रपट आहे, त्यामुळे त्यातील गाणीही तितकीच एनर्जेटिक असावी, असे मला वाटत होते आणि ‘नवरोबा’च्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली. या गाण्याची संपूर्ण टीम अफलातून आहे. चैतन्यचे बोल आणि एग्नेल रोमनचे उत्स्फूर्त संगीत या गाण्यात प्रचंड ऊर्जा आणत आहेत. त्यात ज्योती भांडे आणि सीजर यांची गायकी. सगळेच मस्त जमून आले आहे. रेकॉर्डिंग करताना आम्ही हे गाणे खूप एन्जॉय केले. मला खात्री आहे संगीतप्रेमींच्या ओठांवर हे गाणे रेंगाळेल’.