HSRP Number Plate: वाहन धारकांसाठी मोठा दिलासा! घरबसल्या मिळणार नंबर प्लेट, मात्र आहेत ‘या’ अटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HSRP Number Plate: वाहन धारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे! जर तुम्ही अद्याप HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट बसवलेली नसेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्हाला फिटमेंट सेंटरला भेट देण्याची आवश्यकता नाही. हो, तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा सोसायटीतच तुमचं HSRP नंबर प्लेट बसवून मिळणार आहे, पण त्यासाठी एक अटी आहेत.

राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने सूचित केले आहे की, एकाच ठिकाणी किंवा सोसायटीत (HSRP Number Plate) 25 किंवा त्यापेक्षा जास्त वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज केला तर त्या ठिकाणी सोयीच्या एजन्सीद्वारे नंबर प्लेट बसवली जाईल. यासाठी कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही.

30 जूनपर्यंत मुदत वाढवली (HSRP Number Plate)

तुम्हाला आणखी एक दिलासादायक बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी दिलेली मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांसाठीचे स्लॉट पूर्ण झाले होते, त्यामुळे अनेक वाहनधारकांना अर्ज करण्यासाठी अडचणी येत होत्या. आता या मुदतीत वाढ करून, तुम्हाला नंबर प्लेट मिळवण्यासाठी अधिक वेळ दिला आहे.

फिटमेंट सेंटर आणि वितरकांसाठी नवीन सूचना (HSRP Number Plate)

याशिवाय, राज्य सरकारने HSRP प्लेट बसवण्यासाठी फिटमेंट सेंटरच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना (HSRP Number Plate) दिल्या आहेत. तसेच, वाहन वितरकांना नवीन नोंदणी केलेल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. विना HSRP वाहन वितरीत केल्यास संबंधित वाहन वितरकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. वाहन धारकांना आता अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा मिळेल, हे निश्चित आहे.