HSRP Registration : नंबर प्लेट आणि त्या संदर्भातील छेडछाड बनावट नंबर प्लेट अशा चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आता वाहन विभागाकडून ठोस पाऊल उचलण्यात आले असून आता सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या गाड्यांना एच एस आर पी (HSRP) नंबर प्लेट नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात (HSRP Registration) येणार आहे.
याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या गाडीला सुद्धा HSRP नंबर प्लेट नसेल तर लवकरात लवकर लावून घ्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP Registration) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतला गेला असून वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
कसे कराल HSRP नंबर प्लेट बुकिंग? (HSRP Registration)
तुम्हाला जर एच एस आर बी नंबर प्लेट बुकिंग करायचे असल्यास यासाठी तुम्ही निश्चित केलेल्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करू शकता. यासाठी https://mhhsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवून घ्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
किती बसेल भुर्दंड? (HSRP Registration)
- दुचाकी आणि ट्रॅक्टर करिता 450 रुपये यात जीएसटी वेगळी असेल
- तीन चाकी साठी पाचशे रुपये यामध्ये जीएसटी वेगळी असेल
- हलकी मोटर वाहने प्रवासीकार मध्यम व्यावसायिक वाहने अवजड व्यवसायिक वाहने आणि ट्रेलर याकरिता 745 रुपये आकारण्यात येतील आणि जीएसटी वेगळी असेल.