Huawei Enjoy 80: Huawei Enjoy 80 लाँच; 6620mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह धमाका

Huawei Enjoy 80
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Huawei Enjoy 80 – हुवावेने आपल्या Enjoy सिरीजमध्ये एक नवा स्मार्टफोन Huawei Enjoy 80 चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन 2023 मध्ये सादर झालेल्या Huawei Enjoy 70 चा अपग्रेड व्हर्जन आहे. हुवावे एन्जॉय 80 मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले गेले आहेत, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा, 512GB पर्यंत स्टोरेज आणि 6620mAh क्षमतेची मोठी बॅटरी यांचा समावेश आहे. तसेच हा स्मार्टफोन HarmonyOS 4.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. तर चला या ( Huawei Enjoy 80) स्मार्टफोच्या दमदार फीचर्सबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Huawei Enjoy 80 चे फीचर्स –

Huawei Enjoy 80 मध्ये 6.67 इंचांची HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे जी 90Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेससह येते. या फोनमध्ये कंपनीने कोणता प्रोसेसर वापरला आहे, याबाबत अजून खुलासा केलेला नाही. पण , फोनमध्ये 8GB रॅमसोबत 128GB, 256GB आणि 512GB अशा तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्धता आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, हुवावे एन्जॉय 80 मध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइसला IP64 रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे तो डस्ट आणि स्प्लॅशप्रूफ आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी –

या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये देण्यात आलेली 6620mAh बॅटरी जी 40W Huawei SuperCharge टेक्नोलॉजीसह येते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, IR ब्लास्टर, 4G कनेक्टिव्हिटी, Wi-Fi 5, Bluetooth 5.1, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे महत्त्वाचे फीचर्सही देण्यात आले आहेत.

किंमत –

किंमतीच्या बाबतीत, Huawei Enjoy 80 चा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 1,199 युआन (सुमारे 14,000 रु ), 256GB वेरिएंट 1,399 युआन (16,300 रु ) आणि 512GB वेरिएंट 1,699 युआन (19,800 रु) मध्ये उपलब्ध आहे. हा फोन निळ्या , हिरव्या , काळ्या आणि पांढऱ्या अशा रंगांमध्ये Huawei च्या अधिकृत चायना ई-स्टोअरवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.