Human Development Index : भारतीयांचे आयुष्य वाढले आणि कमाईसुद्धा वाढली; मानव विकास निर्देशांक यादीत जगात कितवा नंबर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Human Development Index) युनायटेड नेशन्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अर्थात संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांकातील यादींमध्ये एकूण १९३ देशांच्या नावाचा समावेश आहे. या यादीत आपला देश भारत हा १३४ व्या क्रमांकावर आहे. मानवी जीवनाशी आणि आर्थिक विकासाशी निगडित अनेक गोष्टींचा विचार करून ही यादी तयार केली जाते. दरम्यान, गेल्या २ वर्षांमध्ये जाहीर झालेल्या या यादीतील क्रमवारीमध्ये भारताची आर्थिक स्थिती सुधारल्याचे संकेत दिसून आले आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मानव विकास निर्देशांकात प्रगती (Human Development Index)

संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशकाची २०२२ साली जाहीर करण्यात आलेली क्रमवार यादी पाहिली असता भारताची स्थिती सुधारल्याचे दिसून आले आहे. मानवी जीवनाचा विकास आणि अन्य आवश्यक गोष्टींच्या मदतीने तयार केलेली ही यादी भारताच्या आर्थिक विकासाची चिन्हे दर्शवत आहे.

(Human Development Index) या अहवालाच्या मते, भारतातील दरडोई उत्पन्नातही सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये मानव विकास निर्देशांकात भारताची स्थिती सुधारली असून थोडी प्रगती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या १९३ देशांच्या यादीत २०२१ मध्ये भारत १३५ व्या क्रमांकावर होता. मात्र आता या यादीत भारताचा क्रमांक १३४ वा आहे.

आयुर्मानात मोठी सुधारणा

समोर आलेल्या अहवालानुसार, आपल्या देशात मानवी जीवनाचा आर्थिक क्षेत्राचा विकास होतो आहे. यात शिक्षण आणि आयुर्मानात मोठी सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. तसेच भारतीय व्यक्तीचे आयुर्मान ६७.२ वर्षांवरून ६७.७ वर्षांपर्यंत वाढल्याचे देखील समोर आले आहे. (Human Development Index)

शिवाय देशातील शालेय शिक्षणात सुधारणा झाल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगली प्रगती होताना दिसतेय. या सगळ्यात भारतीयांची सरासरी कमाईसुद्धा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे आणि यानुसार दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न ६ हजार ५४२ वरून ६ हजार ९५१ डॉलर पर्यंत म्हणजेच भारतीय चलनानुसार, अंदाजे ५.७५ लाख रुपये वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

यावेळी लैंगिक असमानता निर्देशांकातही प्रगती

एकूणच संयुक्त राष्ट्रांनी मानव विकासावर जारी केलेल्या अहवालात हे स्पष्ट होत आहे की, आपला देश जवळपास सर्व क्षेत्रात प्रगती करतो आहे. ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांचीही भागीदारी आहे. यात महिला २८.३ टक्के तर पुरुष ७६.१ टक्के भागीदार आहेत. यामध्ये एकूण ४७.८ टक्क्यांचे अंतर आहे.

ज्यानुसार, मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान एका क्रमांकाने सुधारले आहे. असे असले तरी १९९० पासून आत्तापर्यंत देशाने लक्षणीय प्रगती केल्याचे स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर ही भागीदारी स्त्री- पुरूषातील अंतर कमी होताना दर्शवित आहे. अर्थात, भारताने लैंगिक असमानता निर्देशांकातही यावेळी प्रगती केल्याचे या अहवालात समोर आले आहे. (Human Development Index)