हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hyundai IPO) Hyundai Motor India ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी आहे. जिने आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याचे ठरवले आहे. दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे Hyundai Motor India चा IPO हा आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा IPO नक्कीच ठरू शकतो. माहितीनुसार, या इश्यूच्या माध्यमातून साधारण २५ हजार कोटी ते ३० हजार कोटी रुपये जमवण्याचा कंपनीचा मानस आहे.
सल्लागार म्हणून कोटकी महिंद्रा कॅपिटलची निवड
वृत्तानुसार, भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने IPO लॉन्च करण्यासाठी सल्लागार नेमले आहेत. (Hyundai IPO) ज्यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली यांची निवड केल्याचे समजत आहे. या दोन्ही बँका ह्युंदाई इंडियाला IPO लॉन्च करण्यासाठी मदत करणार आहेत. तसेच दक्षिण कोरियाची ह्युंदाई मोटार कंपनी तिच्या भारतीय उपकंपनीच्या IPO साठी मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRPH) येत्या जून – जुलैच्या अखेरीस SEBI कडे पाठवणार आहे.
LIC पेक्षा मोठा IPO असणार (Hyundai IPO)
असे सांगितले जात आहे की, ह्युंदाई मोटार इंडियाचा IPO हा एलआयसीपेक्षा मोठा असू शकतो. कारण, एलआयसीच्या IPO ची किंमत २.७ अब्ज डॉलर्स इतकी होती. त्यासमोर आता ह्युंदाई मोटार इंडियाच्या IPO ची किंमत २.५ ते ३ अब्ज डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार २५ हजार ते ३० हजार कोटी रुपये इतकी असू शकते.
मूल्य किती असणार?
या प्रकरणासंबंधित अधिक माहिती देताना काही तज्ञांनी सांगितले आहे की, भारतीय सबसिडरीनुसार उपकंपनीचे मूल्यांकन २० अब्ज डॉलर इतके असू शकते. मात्र, अद्याप याबाबत ठोस सांगू शकत नाही. (Hyundai IPO) त्यामुळे तर्क काढणे घाईचे ठरेल. वृत्तानुसार, IPO चे मूल्य आणि आकार अद्याप निश्चित असा ठरलेला नाही. त्यामुळे ठोस काहीही सांगता येणार नाही.